शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मधल्या जवळिकीने वाढला ‘दुरावा’, अनलॉक होताच पोलिसांकडे २०८ तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:15 IST

Family News : आवश्यकतेपेक्षा जास्त लाभलेला हा सहवास काही दाम्पत्यांच्या संसारात काडी टाकणारा ठरला आहे. या कालावधीत पती किंवा पत्नीवर संशय  निर्माण करणाऱ्या  घटना अनेकांच्या घरात घडल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई -  लॉकडाऊनमध्ये पती- पत्नीमधील वाढलेला सहवास वेगवेगळ्या वादाला कारणीभूत ठरला आहे. या कालावधीत घडणाऱ्या गोष्टी एकमेकांविरोधात संशय निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे अनलॉक होताच, पती-पतीमधील कलहातून पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.कोरोनामुळे राज्यासह देशभरात लॉकडाऊन  लागू असताना, तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक जण घरात बंदिस्त होता. यादरम्यान अनेक दाम्पत्यांना प्रथमच एकमेकांना एवढा वेळ देता आला, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त लाभलेला हा सहवास काही दाम्पत्यांच्या संसारात काडी टाकणारा ठरला आहे. या कालावधीत पती किंवा पत्नीवर संशय  निर्माण करणाऱ्या  घटना अनेकांच्या घरात घडल्या आहेत. त्यात स्मार्टफोनही  तितकाच कारणीभत ठरल्याचे  काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. अमूक एक गोष्ट आजवर माझ्यापासून का लपवली?  यापासून ते एकमेकांचे  मित्र-मैत्रिणी खटकण्यापर्यंतच्या  कारणांचा त्यात समावेश आहे. विविध कारणांनी कित्येक दाम्पत्यांचा लॉकडाऊनचा कालावधी आपापसात भांडणातच गेला आहे.परिणामी, काही केल्या आपसात पटत नसल्याने अनलॉक होताच, अशा पती-पत्नींनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे, तसेच महिला सहायता कक्षाकडे धाव घेतली आहे. लॉकडाऊन संपताच नवी मबई पोलिसांच्या महिला सहायता कक्षाकडे कौटुंबिक कलहाच्या २०८ तक्रारी प्राप्त झालया आहेत. त्यापैकी ८८ तक्रारी गत कालावधीत निकाली काढण्यात आल्या असून, त्यामधील १५ दाम्पत्यांनी पुन्हा जमवून घेतले आहे, तर ९ प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित १२० तक्रारींवर अद्याप सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Familyपरिवारrelationshipरिलेशनशिप