परिवहन समितीच्या सभेमध्ये विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:08 AM2019-06-01T01:08:26+5:302019-06-01T01:08:38+5:30

एनएमएमटीने शहरामध्ये बीओटी तत्त्वावर २५० बसशेल्डर उभारले जाणार आहेत. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणाºया या शेल्टरवर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे अधिकार देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

Protesters meeting in meeting of transport committee; Embarrassment about the ruling party | परिवहन समितीच्या सभेमध्ये विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी

परिवहन समितीच्या सभेमध्ये विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी

Next

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)च्या सभेमध्ये जाहिरात हक्क देणे व बसदुरुस्तीचे प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रसने फेटाळले, यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी सभात्याग करून सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप केला आहे.

एनएमएमटीने शहरामध्ये बीओटी तत्त्वावर २५० बसशेल्डर उभारले जाणार आहेत. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणाºया या शेल्टरवर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे अधिकार देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी २०१८ पासून ही प्रक्रिया सुरू होती; परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे निविदा सादर करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. जानेवारी २०१९ मध्ये पाचवी मुदतवाढ देण्यात आली. या वेळी चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. १५ वर्षांसाठी हा ठेका देण्यात येणार आहे. यासाठी प्रोअ‍ॅक्टिव इन अ‍ॅण्ड आउट अ‍ॅडर्व्हटायझिंग कंपनीने सर्वाधिक ४१ लाख ५५ लाख १४ हजार रुपये किमतीची निविदा सादर केली होती. त्यांना हे काम देण्यासाठीचा प्रस्ताव परिवहनच्या सभेमध्ये सादर करण्यात आला होता; परंतु राष्ट्रवादी व काँगे्रसच्या सदस्यांनी यास हरकत घेतली व हा प्रस्ताव फेटाळला. यामुळे शिवसेना, भाजप सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

सीएनजी बसच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा ठेका देण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. बसदुरुस्तीसाठी महिन्याला आठ लाख रुपये व वर्षाला ९६ लाख रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्तावही रद्द करण्याची सूचना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केली, यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व मनमानीचा निषेध करून सभात्याग केला. शिवसेना सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप केला आहे. दोन्ही प्रस्ताव बहुमताच्या बळावर फेटाळण्यात आले आहेत. यामुळे परिवहनचे नुकसानच होणार आहे. बसदुरुस्तीचा ठेका दहा महिन्यांपूर्वी संपला आहे.

सद्यस्थितीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदाराकडून काम करून घेतले जात असून त्याला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाला असता तर परिवहनचे पैसे वाचले असते, अशी भूमिका व्यक्त केली आहे. बसथांबे व बसदुरुस्तीचा प्रस्ताव सत्ताधाºयांनी बहुमताच्या बळावर फेटाळला आहे. यामुळे परिवहनचे नुकसान होणार आहे. मनमानीचा निषेध करून आम्ही सभात्याग केला. - विसाजी लोके, परिवहन सदस्य

परिवहन समितीच्या बैठकीमध्ये मांडलेले दोन्ही प्रस्ताव महत्त्वाचे होते. नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबविलेली असताना सत्ताधाºयांनी हे प्रस्ताव फेटाळले. परिवहनच्या हिताकडेही दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही सभात्याग केला. - समीर बागवान, परिवहन सदस्य.

परिवहन समिती बैठकीमध्ये दुसºया बसदुरुस्तीच्या विषयावर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी प्रस्ताव फेटाळण्याचे मत मांडताच विरोधकांनी आक्रमक होऊन सभात्याग केला. आम्ही या विषयावर चर्चेची तयारी दर्शविली होती. विनंती करूनही विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात थांबले नाहीत. - रामचंद्र दळवी, सभापती, एनएमएमटी

Web Title: Protesters meeting in meeting of transport committee; Embarrassment about the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.