शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:59 IST

मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती यामुळे पनवेलकरांचा रविवार आनंदी व उत्साहात गेला.

कळंबोली : मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती यामुळे पनवेलकरांचा रविवार आनंदी व उत्साहात गेला. ओरियन मॉलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मॉल व्यवस्थापन व ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती.पनवेल शहरात दोन वर्षांपूर्वी मंगेश परुळेकर यांनी ओरियन मॉल सुरू केला. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेला हा मॉल गर्दीचे ठिकाण बनले आहे. वर्षभर येथे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. परंतु कालच्या रविवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्र म आनंदाला उधाण आणणारा होता. ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमातील नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे यांच्या गाण्याने रसिकांची मने जिंकली. मला वेड लागले प्रेमाचे... या गाण्याने कार्यक्र माची सुरुवात झाली. या गाण्याला उपस्थितांची वाहवा मिळाली. तर चोरीचा मामला मामाही थांबला... या बोलावर वर्षा उसगावकरांनी सुद्धा नृत्य करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच चिकणी चमेली, इतिसी हसी इतिसी खुशी इत्तासा तुकडा चाँद का, नदीच्या पल्याड आईचा डोंगर या गीताने वातावरण भक्तिमय केले. काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार या गीतावर ओरियन मॉल संगीतमय झाले. नीतिक्स क्रि एशनने हा कार्यक्र म सादर केला. वर्षा उसगावकर यांच्याशी मीनल जोगळेकर यांनी संवाद साधत अनेक गोष्टींचा उलगडा केला.चित्रपट आणि मालिकांमध्ये बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागते, असे उसगावकरांनी सांगितले. त्याचबरोबर कोकणी भाषेत ‘जावई नंबर वन’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘लोकमत’बद्दल सुद्धा वर्षा उसगावकर भरभरून बोलल्या. हे वृत्तपत्र घराघरात वाचले जाते, आपण ‘लोकमत’चे वाचक असल्याचे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. या वेळी मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, दिलीप करेलिया, नैना करेलिया, सिमरन मोटर्सचे मालक मीना कोहली, उपाध्यक्ष अरविंद सिंग आदी उपस्थित होते.कुसुम ससाणे ठरल्या लकीओरियन मॉलच्या वतीने ग्राहकांकरिता बम्पर लॉटरी धमाका ठेवण्यात आला होता. एकूण पंधरा ग्राहकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी एक चिठ्ठी वर्षा उसगावकर यांच्या हस्ते काढण्यात आली. करंजाडे येथील कुसुम ससाणे लकी ठरल्या आणि त्यांना मारुती सुझुकी कार बक्षीस मिळाली.

टॅग्स :newsबातम्याNavi Mumbaiनवी मुंबई