शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: January 10, 2016 00:45 IST

नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार असल्याने नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान होत आहे. राजकीयदृष्ट्या या निवडणुकीला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादीने शिल्पा कांबळे , भाजपाने सरस्वती पाटील व काँगे्रसने नूतन राऊत यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीला नवी मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दाखविण्यासाठी ही जागा जिंकावी लागणार आहे. शिवसेना - भाजपाने राष्ट्रवादीकडून महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एक जागेमुळे सत्तापरिवर्तन होणार नाही, परंतु राष्ट्रवादीच्या दिघामधील चार व इतर ठिकाणच्या काही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशा स्थितीमध्ये युतीसाठी एक जागाही महत्त्वाची ठरणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे, विजय नाहटा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागात तळ ठोकला होता. सुरुवातीला पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. परंतु सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे पूर्ण शहरवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. एक प्रभागाच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्यामुळेही शहरातील पक्षाचे सर्व कार्यकर्तेही येथे तळ ठोकून होते. शेवटच्या दिवशी परिसरात पैसे वाटपाची जोरदार चर्चा होती. मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरू लागले होते. यामुळे पोलिसांनीही कडक बंदोबस्त लावला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, दोन तासांनंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जल्लोषाची तयारीही सुरू केली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तनेरूळ प्रभाग ८८ मध्ये रविवारी पोट निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व्हावी, याकरिता पोलिसांतर्फे रूट मार्चदेखील काढण्यात आला. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी सेंट झेवियर्स शाळेत होणार असल्याने या केंद्रापासून १०० मीटरवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.