शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

गाढेश्वर धरणावर पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: July 17, 2017 01:23 IST

वीकेंडमुळे वर्षासहलीसाठी गाढेश्वर धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने मद्यपी नाराज झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : वीकेंडमुळे वर्षासहलीसाठी गाढेश्वर धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने मद्यपी नाराज झाले. प्रत्येक गाडी चेक करून पुढे सोडण्यात येत होती. पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवाला मुकतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय पोलीस गस्तही असते. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक गाढेश्वर (देहरंग) धरणावर येतात. काही जण पोलिसांची नजर चुकवून जातात, तर काही पर्यटक दुसऱ्या रस्त्याने धरणाच्या दिशेने जातात. मात्र धरणाकडे गेटला कुलूप असल्याने कुणालाही आत जाता येत नाही. त्यामुळे पर्यटक गाढी नदीच्या पाण्यातच भिजण्याचा आनंद घेतात. तरुणाईकडून धोदाणी धबधब्यालाही पसंती देण्यात येत आहे. मात्र वाजे गावाजवळ बेरिगेट्स लावून बसलेले पोलीस गाड्या तपासूनच पुढे पाठवत आहेत. मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी धरणाच्या परिसरात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.