गाढेश्वर धरणावर पोलीस बंदोबस्त

By Admin | Updated: July 17, 2017 01:23 IST2017-07-17T01:23:40+5:302017-07-17T01:23:40+5:30

वीकेंडमुळे वर्षासहलीसाठी गाढेश्वर धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने मद्यपी नाराज झाले.

Police settlement on Gadheshwar dam | गाढेश्वर धरणावर पोलीस बंदोबस्त

गाढेश्वर धरणावर पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : वीकेंडमुळे वर्षासहलीसाठी गाढेश्वर धरणावर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने मद्यपी नाराज झाले. प्रत्येक गाडी चेक करून पुढे सोडण्यात येत होती.
पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवाला मुकतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय पोलीस गस्तही असते. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक गाढेश्वर (देहरंग) धरणावर येतात. काही जण पोलिसांची नजर चुकवून जातात, तर काही पर्यटक दुसऱ्या रस्त्याने धरणाच्या दिशेने जातात. मात्र धरणाकडे गेटला कुलूप असल्याने कुणालाही आत जाता येत नाही. त्यामुळे पर्यटक गाढी नदीच्या पाण्यातच भिजण्याचा आनंद घेतात. तरुणाईकडून धोदाणी धबधब्यालाही पसंती देण्यात येत आहे. मात्र वाजे गावाजवळ बेरिगेट्स लावून बसलेले पोलीस गाड्या तपासूनच पुढे पाठवत आहेत.
मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी धरणाच्या परिसरात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

Web Title: Police settlement on Gadheshwar dam