शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शांतता क्षेत्रेही अशांतच

By admin | Updated: August 10, 2015 02:27 IST

स्वच्छतेत देशात तिसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहरात ध्वनिप्रदूषणाने मात्र कळस गाठला आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले

प्राची सोनवणे , नवी मुंबईस्वच्छतेत देशात तिसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहरात ध्वनिप्रदूषणाने मात्र कळस गाठला आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सायलेन्स झोनचे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. ध्वनी प्रदूषण निषिध्द असलेल्या या परिसरातही शांतता भंग केली जात आहे. सायबर सिटीत महापालिकेने एकूण ६४ शांतता क्षेत्रे घोषित केली आहेत. यात १२ हॉस्पिटल्स, ५१ शाळा व महाविद्यालये आणि एका वृध्दाश्रमाच्या परिसराचा समावेश आहे. यापैकी १६ ठिकाणी सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. सायलेन्स झोन म्हणून घोषित केलेल्या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांना कर्कश आवाजांचा त्रास होवू नये, या दृष्टीने या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यातीत तरतुदीनुसार सायलेन्स झोन परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत हॉर्न वाजविण्यास मनाई आहे. तसेच या शांतता क्षेत्रांत मोठमोठ्याने वाद्ये वाजविणे, फटाके फोडणे यास सक्त मनाई आहे. मात्र नवी मुंबईत या नियमाला सपशेल हरताळ फासण्यात येत आहे. सायलेन्स झोनच्या फलकांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. नियमानुसार सकाळच्या वेळी ५० डेसिबल तर रात्रीच्या वेळी ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे.सायबर सिटीत आवाज ़निषिध्द क्षेत्रामध्ये सकाळी ५० डेसिबलहून अधिक तर रात्री ४० डेसिबलहून अधिक प्रमाणात ध्वनिप्रदूषणाची नोंद केली जात आहे.