शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या घुसखोरीने प्रवासी त्रस्त

By admin | Updated: November 8, 2016 02:50 IST

हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

नवी मुंबई : हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नसल्याने फेरीवाले बिनधास्तपणे वावरताना पहायला मिळतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीच्या वेळेतही फेरीवाल्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार प्रवासी संघाकडून केली जात आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-ठाणे आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल या मार्गावरील लोकलमध्ये फेरीवाले, विक्रेते, भिकारी आणि तृतीयपंथीयांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वच रेल्वेस्थानकांवर होमगार्ड व रेल्वे पोलीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तैनात असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर पोलीस व होमगार्ड यांची कमतरता भासते. रात्रीच्या वेळी देखील प्रवाशांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे. लोकलमधील भिकाऱ्यांमध्ये महिला तसेच बालक यांचे प्रमाण जास्त आहेत. ही लहान मुले जबरदस्तीने प्रवाशांकडून पैशांची मागणी करत असल्याचे चित्र पहायला मिळते. कॅन्सरग्रस्त मुलांना मदत म्हणून प्रवाशांना फसवून मदत निधी गोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेतही फेरीवाले प्रवाशांना ढकलून, शिवीगाळ करुन हक्क गाजवित असल्याचे प्रकार पहायला मिळतात. प्रवाशांनी पैसै देण्यास नकार देताच तृतीयपंथीयांकडून शिवीगाळ करून शिव्याशाप देतात. पोलिसांचा धाक दाखविला तर प्रवाशांशी वाद घालत फेरीवाल्यांकडून मनमानी केली जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. महिला प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असून पुरुष फेरीवाल्यांकडून छेडछाड होत असल्याचे प्रवासी विनिता शिंदे यांनी सांगितले. महिला सुरक्षेसाठी होमगार्ड, पोलीस, आरपीएफ यांची नियुक्ती करुन किमान महिला डब्यासमोरील सुरक्षेकडे लक्ष दिले जावे. फेरीवाल्यांच्या घुसखोरीवर वेळीच लगाम घातला तर प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येऊ शकतो, असे मत नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)