शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल ही माझी कर्मभूमी आहे

By admin | Updated: November 12, 2015 01:53 IST

मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो,

पनवेल : मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो, तेव्हा प्रथम मला उरणमधील चिरनेर आणि पनवेल परिसराने आसरा दिला, असे भावपूर्ण उद्गार ‘वस्त्रहरण’कार आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी काढले. नुकता पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कांतीलाल प्रतिष्ठान रायगडच्यावतीने गवाणकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पनवेल परिसरात मला नाटकांचं बाळकडू मिळालं. चिरनेर येथील जनार्दन चेऊलकर यांनी मला मुंबईत पदपथावर, स्मशानात झोपताना पाहिले. तेंव्हा त्यांनी मला तेथील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी नेले. तिथेही १० ते १५ माणसे रहात होती. तिथून अर्थातच मला बाहेर पडावं लागलं. कारण ती जागा त्यांनाच पुरत नव्हती. पण त्या माणसांचं मन मोठं होतं. त्यानंतर मी चिरनेर मुंब्रा परिसरात होतो. तेथील आगरी भाषेने या मालवणी पुत्राला लळा लावला. मला एक आगरी नाटक पाहिलेलं आठवतं. त्यात एक नारदाचं पात्र होतं. पण ऐनवेळी तंबोराच मिळेना. मग एका टोपलीला गोणीत गुंडाळून त्याला दांडा लावून, दोऱ्या बांधून तंबोरा तयार झाला. नारदापेक्षा तो तंबोरा मोठा होता. ते पाहून सगळे हासत होते.‘वस्त्रहरण’ या माझ्या मालवणी नाटकाचं बीज अशा प्रकारे नकळत माझ्या मनात रुजलं. मराठी माणूस एकवेळ पाण्याविना जगू शकेल पण नाटकाविना नाही, असे सांगून गवाणकर यांनी यावेळी ‘वस्त्रहरण’चे काही किस्से सांगितले. ते म्हणाले की हे नाटक सुरु वातीला चाललं नव्हते. या नाटकाने मला खूप भोगायला लावलं. त्यानंतर ६० वा. शेवटाचा प्रयोग पुण्यात करावयाचा असं आम्ही ठरवलं तो मराठीत होता. त्याला पु. ल. देशपांडे हजर होते. त्यांना खदाखदा हसताना पाहून मी धन्य झालो. त्यानंतर त्यांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, नाटकात मला एक छोटीशी भूमिका मिळाली तरी मी स्वत:ला धन्य समजेन. आम्ही ते पत्रच नाटकाच्या जाहितीत प्रसिद्ध करू लागलो. तेव्हापासून आमच्या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला. पाच हजारा वा प्रयोग मोठ्या दणक्यात करून प्रसाद कांबळीने नाट्यसृष्टीत मोठा इतिहास घडविला. गवाणकरांनी यावेळी उपस्थित सर्व पक्षिय नेत्यांना मिश्किलपणे कोपरखळ्या लगावल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, जीवनात नाट्य, भांडणे, वाद हवेतच. ते जिवंतपणाचे लक्षण असते. हे राजकीय रंगभूमिवरील अभिनेत्यांनी लक्षात ठेवावे. मच्छिंद्रच्या मनात शिवाजी पार्कवरील राजकीय नेत्यांना अभिनय करायला लावून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पाच हजारावा ‘वस्त्रहरण’ चा प्रयोग करण्याची इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, शेकाप नेते व माजी आ. विवेक पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)