शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिका क्षेत्रात श्वान निर्बीजीकरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:19 IST

निविदेला मंजुरी; स्थायी समितीत निर्णय

पनवेल : पनवेल पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय चांगलाच गाजला. या अनुषंगाने शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी देण्यात आली आहे.

स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्याने प्रवीण पाटील यांच्या जागी प्रभारी सभापती म्हणून परेश ठाकूर यांनी काम पाहिले. या वेळी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी केवळ एकच निविदा पालिकेला प्राप्त झाली होती. संबंधित इन डिफेन्स आॅफ अ‍ॅनिमल या कंत्राटदारामार्फत जादा दर आकारले जात असल्याने त्याच्या निविदा मंजुरीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी पनवेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातल्याने लवकरात लवकर निर्बीजीकरणाची गरज लक्षात घेत शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समिती सभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता प्रतिश्वान १३९० रुपये आकारणी ही संस्था करणार आहे.

पालिका क्षेत्रात सुमारे ५००० ते ५५०० भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. मागील वर्षभरापासून निर्बीजीकरण बंद असल्याने या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निविदेला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश या वेळी प्रभारी सभापती परेश ठाकूर यांनी दिले.

नवीन पनवेल येथील पोदी स्मशानभूमीजवळ पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या सात वेगवेगळ्या खोल्यामध्ये निर्बीजीकरण केले जाणार आहे. सभेत पालिकेचे लेखाधिकारी मनोजकुमार शेट्टे यांनी पनवेल महापालिकेचे बँक खाते पीएमसी बँकेतच का उघडले? याबाबतही चर्चा करण्यात आली.

भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्बीजीकरणासाठी मागविलेल्या निविदेला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने ही निविदाप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारच्या सभेत याबाबत निर्णय घेऊन निर्बीजीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरात लवकर निर्बीजीकरणाला सुरुवात होणार आहे.
- परेश ठाकूर, प्रभारी सभापती, स्थायी समिती, पनवेल महापालिका

असे करणार निर्बीजीकरण
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. ज्या विभागात जास्त कुत्रे आहेत, याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कंत्राटदारामार्फत कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण केंद्रात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले जाईल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात कुत्र्यांना सोडले जाणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर श्वानांवर एक खूण केली जाणार आहे.