पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:47 AM2021-03-14T08:47:19+5:302021-03-14T09:34:50+5:30

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६ केंद्रांवर सध्याच्या घडीला लसीकरण केले जाते. आजतागायत २३,२८७ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आलेले आहे.

Panvel Municipal Corporation has shortage of covid vaccine, once again inconvenience to senior citizens | पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय

पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय

Next

पनवेल: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या कोविड लसीकरणात पुन्हा एकदा खंड पडला आहे. शासनाकडून पुरविला जाणारा साठा संपुष्टात आल्याने पनवेल पालिकेने शासकीय आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद केले आहे. पालिका प्रशासन खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याचे सांगत असले तरी खाजगी रुग्णालयांनी लसीकरण बंद केल्याने भर उन्हात लसीकरिता खेटे मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. (Panvel Municipal Corporation has shortage of covid vaccine, once again inconvenience to senior citizens)

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६ केंद्रांवर सध्याच्या घडीला लसीकरण केले जाते. आजतागायत २३,२८७ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये ७३८८ आरोग्य विभागातील कर्मचारी, ४१५७ महसूल व पोलीस कर्मचारी, ८३४५ ज्येष्ठ नागरिक व ६८२ अशा इतर जणांना कोविड लस देण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा लसीचा तुटवडा भासत असल्याने पालिकेने शासकीय केंद्रातील लसीकरण पूर्णपणे बंद केले आहे. मोजक्याच खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू असल्याने अनेक वेळा लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या म्हणण्यानुसार, उन्नती हॉस्पिटल, पनवेल हॉस्पिटल, येरळा मेडिकल व लाइफलाइन हॉस्पिटल, बिरमोळे हॉस्पिटल आदी खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे.  लसीकरणाअभावी ज्येष्ठ नागरिकांना घरी परतावे लागले आहे. याबाबत काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

कोविडसारख्या गंभीर आजारावरील लसीकरणात खंडच कसा पडतो, असा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला याबाबत गांभीर्य आहे की नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे भर उन्हात घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिकेने लसीकरणाचा साठा संपुष्टात आल्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. 

 

 

Web Title: Panvel Municipal Corporation has shortage of covid vaccine, once again inconvenience to senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.