Panvel gas leaks into the metropolis | पनवेलमध्ये महानगर गॅसवाहिनीला गळती
पनवेलमध्ये महानगर गॅसवाहिनीला गळती

पनवेल : पनवेलच्या एसटी स्टॅण्ड जवळील येसू नारायण बिल्डिंग परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना महानगर गॅसची वाहिनी फुटली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना मंगळवारी दुपारी १च्या सुमारास घडली.
पनवेल परिसरात रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. मंगळवारी एसटी स्टॅण्डजवळील यसू नारायण बिल्डिंग परिसरात खोदकाम सुरू असताना महानगर गॅसच्या वाहिनीला गळती लागली. या घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थतीचा आढावा घेतला. वेळीच कार्यवाही केल्याने मोठा अपघात टळल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Panvel gas leaks into the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.