शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल न्यायालयाचा पार्किंग प्रश्न चिघळणार

By admin | Updated: December 22, 2016 06:47 IST

पनवेल न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन ते आता संपुष्टात देखील आले आहे. मात्र याठिकाणच्या पार्किंगच्या अभावामुळे

पनवेल : पनवेल न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन ते आता संपुष्टात देखील आले आहे. मात्र याठिकाणच्या पार्किंगच्या अभावामुळे या न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय रेंगाळला आहे. विशेष म्हणजे पार्किंग प्रश्नावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याच्या सचिवांना यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर शासकीय स्तरावर त्वरित हालचाली होवून या इमारतीची पाहणी केली. या पाहणी नंतर न्यायालयासमोरील आठ मीटरच्या रस्त्यातील अडीच मीटरचा रस्ता पार्किंगसाठी ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेने प्रखर विरोध दर्शविला आहे. बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेत शिवसेना शिष्टमंडळाने या प्रस्तावाला विरोध केला आहे. अरु ंद असलेल्या रस्त्याला आणखी लहान करू नयेत. यामुळे शहरात पार्किंगचा विषय आणखी चिघळेल, अशी भीती शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केली आहे. ११ कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या न्यायालयात केवळ ४0 वाहनांची पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. २३ डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना यासंदर्भात निवेदन देऊन अडीच मीटरचा प्रस्ताव रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव रद्द न झाल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. (प्रतिनिधी)