शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसराला पुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:57 IST

  मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.

- वैभव गायकरपनवेल -  मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.बारापाडा आणि डोळघर ही कर्नाळा अभयारण्य तसेच नदीजवळ असल्याने नदीने पातळी गाठल्यास ते पाणी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या वरून जात असते. मागील अनेक वर्षांपासून जोरदार वृष्टीमुळे या गावांना हा फटका बसत आला आहे. पनवेल तहसील कार्यालयाच्या मार्फत पनवेल शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी बाहेर गेले असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. विशेष म्हणजे, या मार्गावर पडलेले खड्डे ही चिंतेची बाब बनत चालली आहे.सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली ते खारघर या ठिकाणी सुमारे चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, तीन ते चार कि.मी. वाहतूककोंडी होऊनही खारघर टोलनाक्यावर टोलवसुली सुरूच होती. महानगरपालिकेच्या मार्फतही ठिकठिकाणी आपत्कालीन पथके पाचारण करण्यात आली होती.महामार्गावर कोंडीसायन - पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. रविवारीही तुर्भे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तुर्भे वाहतूक चौकीच्या परिसरामध्ये रोडची दुरवस्था झाली असून, पाऊस पडला की येथे चक्काजाम होत असून, वाशीपर्यंत वाहतूककोंडी होत आहे. कळंबोली, टोलनाका परिसरामध्येही वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.धरणाचे पाणी सोडल्यास बाधित होणारी गावेजांभिवली (बामणोली) धरणक्षेत्र सावणे, जांभिवली.सावणे धरण सावणे, देवळोलीउसण धरण सावळेगाढेश्वर (देहरंग)तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्रपनवेल (ग्रामीण)शिलोत्तर-रायचूर, पलीदेवद, आसुडगाव, विचुंबे, काळुंद्रे (भिंगारी) देवद, उसर्ली खुर्द, कामोठे, नौपाडापनवेल (शहर)कोळीवाडा, पटेल मोहल्ला, बावन बंगला, मिडल क्लास सोसायटी.ओवळे (विभाग)वडघर, कारंजाडे, वाघिवली, कोळखे, पळस्पे.मोरबे (विभाग)शिरवली मोहदार, चिंध्रन, धोदानी, चिपळे, केवाले, हरिग्राम.पोयंजे (विभाग)वावेघर, गुळसुंदे, टुरडे, आपटे, कळिवले, कारंडे खुर्द, कासप, सवणे.तळोजे (विभाग)पडघे, नावडे, रोडपली, घोटगाव, तळोजे मजकूर, तळोजा पाचनंद, कळंबोली वसाहत.दरड कोसळण्याची संभाव्ये गावेपनवेल : चिखले, वारदोली, आकुर्ली, माची प्रबळ.ओवळे : वडघर, करंजाडे, ओवळे, कोळखे, पळस्पे.मोरबे : मोहदर, धोदानी, खयरेवाडी, कोंडाळे, हरिग्राम, खानाव, वाजे, चेरवली.पोयंजे : लडीवाली, कालिवली, सावणे, सारसाई.तळोजा : चाळ, पाले बु.नवी मुंबईमध्येवृक्ष कोसळलेनवी मुंबईलाही रविवारी पावसाने झोडपले. शहरात वृक्ष कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. सीबीडी सेक्टर १ व एनआरआय सेक्टर ५० मध्येही वृक्ष कोसळल्याची नोंद झाली आहे. शहरातील भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडू लागल्या असून, शिरवणे पुलाच्या खालील रोडवर खड्ड्यामुळे दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.पर्यटनस्थळी कडक बंदोबस्तगाढीसह सर्व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्यामुळे पनवेल तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नदीपात्र व धबधब्यांच्या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात जाणाºया सर्व वाहनांची तपासणी केली जात होती. पोलीस बंदोबस्तानंतरही अनेक पर्यटक नजर चुकवून नदीमध्ये डुबक्या मारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सायंकाळपर्यंत या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता.दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गावात काही ठिकाणी पावसाचे पाणी शिरले होते. मात्र, कोणाचे नुकसान झाले नाही.- शेखर कानडे,रहिवासी,बारापाडासंभाव्य धोके असलेल्या गावांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत योग्य नियोजन करता यावे, याकरिता लावण्यात आलेल्या बैठकीला गावातील सदस्य हजर होते.- बी. टी. गोसावी,नायब तहसीलदार

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊसfloodपूर