शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शतकोत्तर परंपरा जपणारी मुंबापुरीतील जुनी मंडळे

By admin | Updated: September 21, 2015 03:08 IST

बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़

बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़ आपला बाप्पा वेगळा उठून दिसावा म्हणून बाप्पा उंचच उंच होत गेला. भक्तांच्या मनोरंजनाच्या बरोबरीने त्यांना ज्ञान मिळावे यासाठी चलतचित्र, देखाव्यांची स्पर्धा सुरू झाली. काळानुरूप गणेशोत्सव बदलत गेला. नव्या पिढीसमोर आलेल्या गणेशोत्सवात सात्विक, धार्मिक भाव कुठेतरी लुप्त होताना दिसू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्याचा विसर पडतोय का, असा प्रश्न पडू शकतो. पण गिरगावातील जुनी मंडळे ज्या सार्वजनिक मंडळांनी शंभरी पार केली आहे, ती गणेशोत्सव मंडळे अजूनही पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करतात. केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळक यांनी पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईक चाळ’ हे मंडळ गणपतीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ््याची मिरवणूक पालखीतून काढतात. या मिरवणुकीत वाडीतील रहिवासीच ढोल वाजवतात. लेजीमपथकही वाडीतील रहिवाशांचे आहे. पालखी धरणारे अनवाणी येतात़ प्रत्येक पुरुष टोपी घालूनच मिरवणुकीत सहभागी होतो. गणपतीचे पावित्र्य जपण्यासाठी देव्हाऱ्यात प्रवेश करताना अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. कीर्तन असते. एकादशीच्या दिवशी अखंड नामस्मरण केले जाते़ प्रत्येक घराला एक तासाचा वेळ दिला जातो, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक दिनेश जोशी यांनी दिली. जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाकूद्वार येथील जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश याग, सहस्त्रावर्तने केली जातात. वाडीतील जुने रहिवासी अनंत चतुर्दशीला आवर्जून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या मंडळात पूजेसाठी एका छोट्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर दुसरी गणेशमूर्ती विविध रूपांत साकारली जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ, कॅडबरी, बॉल बेरिंगचे बॉल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा वापर करून या मंडळातील कार्यकर्तेच गणेशमूर्ती साकारायचे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंगेश पिटकर यांनी दिली. धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आगमन पालखीतून होते. एक वर्ष कीर्तन आणि एक वर्ष भजनाचे आयोजन केले जाते. सध्याच्या जीवनशैलीमध्ये कोणालाही वेळ नसतो. नोकरीच्या अनिश्चित वेळामुळे एकत्र भेटता येत नाही. अशावेळी गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळी एकत्र येतात. यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंडळातील मुलांवर विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही तिसरी किंवा चौथी पिढी आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपली जाते. उत्सवात कोणत्याही प्रकारचा अतिरेक केलेला नाही, असे मंडळाचे पदाधिकारी सदानंद खेडेकर यांनी सांगितले. आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या १०० वर्षांपासून मूर्तीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक या तीनही गोष्टींचा समावेश आहे. लहान मुलांना, तरुणांना उत्सवात सामाजिक कार्याचे बाळकडू दिले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिली.