ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:46 IST2025-10-29T18:44:33+5:302025-10-29T18:46:14+5:30

Women raped in Panvel Crime News: विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने नागपूरमधील सहकारी महिलेवर घरी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडला. आरोपीने बलात्कार केला, तर त्याच्या पत्नीने व्हिडीओ बनवला आणि दोघांनी तिच्याकडून लाखो रुपये उकळले. 

Office woman came to Mumbai, manager took her home for dinner and raped her; wife made a video | ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Panvel News Women Raped: नागपूरमधील एका ३२ वर्षीय महिलेवर तिच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाने फसवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयात शाखा व्यवस्थापक असलेल्या आरोपीची महिलेसोबत ऑनलाईन बैठकीत झाली होती. महिला ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईत आली असता, त्याने तिला जेवण्यासाठी घरी नेले. तिला गुंगीचे औषध दिले आणि अत्याचार केल्याचे तपासातून समोर आले. 

प्रदीप नरळे असे आरोपीचे नाव आहे. तो अंधेरीतील विमा कंपनीत शाखा व्यवस्थापक आहे. नागपूरमध्येही वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय महिलेशी त्याची ऑनलाईन मिटिंग दरम्यान ओळख झाली होती. त्याने महिलेशी संपर्क वाढवला.

महिलेला जेवणासाठी घरी घेऊन गेला...

२७ मार्च रोजी महिला ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आली होती. त्यावेळी तिचा नरळेशी संपर्क आला. नरळेने तिला पनवेलमधील घरी जेवणासाठी चला असा आग्रह धरला. तो महिलेला घरी घेऊन गेला. घरी त्याची पत्नीही होती. 

जेवणातून महिलेला गुंगीचे औषध देण्यात आले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्याने नरळेने तिच्यावर बलात्कार केला. या कृत्याचा त्याच्या पत्नीने व्हिडीओ बनवला. महिला दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आली. त्यावेळी तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि सोबतचे पैसे चोरीला गेले होते. 

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि पैसे उकळले

आरोपी नरळे इतक्यावरच थांबला नाही. त्याने महिलेला बलात्कार करतानाच व्हिडीओ दाखवला आणि हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी महिलेने त्यांना पैसे दिले. आरोपीने महिलेकडून ८ लाख ११ हजार रुपये घेतले. 

महिलेने हा सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीसह ती नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेली आणि तक्रार दिली. घटना पनवेलमध्ये घडलेली असल्याने हा गुन्हा पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पनवेल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर त्याची पत्नी आणि भाऊ फरार आहे. त्याच्या भावाचाही यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Office woman came to Mumbai, manager took her home for dinner and raped her; wife made a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.