शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

"14 वर्षांचा वनवास जवळपास संपला; साहेब, आता अयोध्येकडे कूच करावं लागेल!"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:36 PM

आता रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

नवी मुंबईः 14 वर्षं पूर्ण करून आपण पुढे निघत आहोत. वनवास जवळपास संपल्यात जमा आहे. आता हा रामाचा वनवास संपवून साहेब आपल्याला लवकरच अयोध्येकडे कूच करावं लागणार आहे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. या पक्षाला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. 14 वर्षांचा प्रवास हा खाचखळग्यांनी भरलेला जरी असला तरी तो आपण स्वाभिमानानं पार केला आहे. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिकानं धारदार कामगिरी करायला हवी, असं आवाहनच बाळा नांदगावकरांनी मनसैनिकांना केलं आहे. 23 जानेवारीला पहिलं महाराष्ट्रातलं आपलं अधिवेशन झालं. 23 जानेवारीला नवीन झेंडा महाराष्ट्राला अर्पण केला.येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊ या. गेल्या 14 वर्षांत पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन करतो. 23 जानेवारी 2020ला मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यानंतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो, असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्या अधिवेशनानंतर आजतागायत चांगलं वातावरण निर्माण होत आहे. 9 फेब्रुवारीला जो मोर्चा काढला आहे, तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मनसेसाठी चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आता आपला प्रवास वेगळ्या दिशेनं सुरू आहे. 

या मेळाव्यास राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक आलेले आहेत. या वेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली गेली आहे. त्यामध्ये 30 ते 40 जणांचा समावेश आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून राहणार आहे. त्या माध्यमातून सरकारला पावलोपावली कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यापुढे मनसेचा राहणार असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या मेळाव्यामुळे नवी मुंबईच्या मनसैनिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यापैकी अनेक जण पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. शॅडो कॅबिनेटमधल्या गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन या विभागांवर बाळा नांदगावकर लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे