शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 3:35 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई  - सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. भुयारी मार्गात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून, महापालिकेने केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते, या ठिकाणी महामार्ग ओलांडणाºया नागरिकांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने ये-जा करणाºया वाहनांमुळे नागरिकांचे रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला होता, त्याला अनुसरून भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामाला महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळवून, चारही भुयारी मार्गाची सुधारणा केली होती. या कामासाठी महापालिकेने तब्बल ४३ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गात करावी लागणारी चढ-उतर, ही प्रवासी नागरिकांना त्रासदायक वाटत असल्याने त्यांनी या भुयारी मार्गाकडे पाठ फिरवली आहे.नेरु ळ एलपी येथील दोन भुयारी मार्गांना गर्दुल्ल्यांनी आपला अड्डे बनविले आहेत. या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि जुगार खेळला जातो, तसेच या भुयारी मार्गाची पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता होत नसल्याने कचरा, मद्य बाटल्यांच्या फुटलेल्या काचा पडलेल्या आहेत. नेरु ळ एसबीआय कॉलनीसमोरील भुयारी मार्गातही कचरा साचला असून, भुयारी मार्गाच्या आतील भागात घाण केली जात आहे.उरण फाटा येथील भुयारी मार्गात साचणाºया पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना न केल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.सीसीटीव्हीची मोडतोड; कारवाईची मागणीसायन-पनवेल महामार्गावर भुयारी मार्गाचा वापर करताना अडचणी येऊ नयेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु या गर्दुल्ल्यांनी या ठिकाणच्या सीसीटीव्हीची मोडतोड केली आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासून, अशा उपद्रवी जुगारी आणि मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या