शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मनपा प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: November 17, 2016 06:28 IST

महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटीलेटर बंद आहेत.

नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. पालिकेच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटीलेटर बंद आहेत. एनआयसीयू विभाग पूर्णपणे बंद झालेला आहे. स्वत: उपचार देण्यास अपयश आले असून स्वस्तात उपचार देणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर आकसाने कारवाई केली जात असल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईमुळे शहरवासीयांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभाराचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यामध्ये प्रशासनास पूर्णपणे अपयश आले आहे. सभापती शिवराम पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका. पालिकेची रुग्णालये बंद पडली आहेत. रुग्णांना उपचार देता येत नाहीत. प्रथम संदर्भ रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील १० पैकी ५ व्हेंटीलेटर बंद पडले आहेत. सहा महिन्यांपासून लहान मुलांचा अतिदक्षता विभाग पूर्णपणे बंद आहे. नवजात शिशूला अतिदक्षता विभागात ठेवण्यासाठीही सुविधाच नसल्याने नाइलाजाने खाजगी रुग्णालयामध्ये जादा पैसे देवून भरती करावे लागत आहे. खाजगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नसल्याने गरीब रुग्णांसाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हा एकमेव आधार उरला आहे. त्या रुग्णालयावर कारवाई करून अप्रत्यक्षपणे गरीब रुग्णांनाच वेठीस धरले जात असल्याची टीकाही सभापतींनी केली. महापालिकेचे सभागृहनेते जे. डी. सुतार यांनीही अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. अक्षरश: रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. रुग्णालयामध्ये पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शुभांगी पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनीही पालिकेच्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली. मनपा रुग्णालयामधील एक्सरे, कलर डॉप्लर, रूटीन सोनोग्राफीसाठीच्या ३३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरीचा विषय स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. याशिवाय राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीमधील तपासण्यासाठी ३३ लाख व मेडिकल गॅस पुरविण्यासाठीच्या २५ लाख रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. आम्ही आरोग्याच्या खर्चाविषयी कधीच कंजुषी करत नाही, पण प्रशासनाने रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने यापूर्वी फटकारले होते महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी हिरानंदानी फोर्टीजसह अनेक हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली होती. या कारवाईविरोधात फोर्टीज व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. रूग्णांच्या आयुष्याशी खेळू नका, असे सुनावले होते. यामुळे या वेळी रूग्णालयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे; पण रूग्णालय बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत. न्यायालयात या निर्णयाचे बुमरँग होऊ नये व नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागू नये, यासाठी असे केल्याचे पालिकेत बोलले जात आहे. गरीब रूग्णांनी जायचे कुठे?महापालिकेने नेरूळमधील डी. वाय. पाटील रूग्णालयात रूग्णांनी जाऊ नये, असे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या निर्णयामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीमध्ये मोफत व सवलतीच्या दरात उपचारासाठी नवी मुंबईमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एकमेव रूग्णालय आहे. इतर कोणत्याही खासगी व महापालिकेच्या रूग्णालयामध्ये गरीब रूग्णांना उपचार घेता येत नाहीत. महापालिकेने डी. वाय. पाटीलमध्ये जाऊ नका असे फर्मान काढले आहे; पण मग गरिबांनी जायचे कुठे असा प्रश्न रूग्ण व लोकप्रतिनिधीही विचारू लागले आहेत. हृदयविकार झालेल्या मुलांना आधार डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीलाही मदतीचा हात दिला. राज्यातील ग्रामीण भागातील हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ६५ पेक्षा जास्त मुलांवर पूर्णपणे मोफत औषध उपचार या रूग्णालयामध्ये करण्यात आले आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळमध्ये येऊन या कार्याचे कौतुक केले होते.