शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:38 AM

आघाडीची बैठक : सुरेश टावरे यांच्या पदाधिकारी भेटीवरून घातला गोंधळ

बदलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी बदलापुरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दौरा केला. बदलापूर ब्लॉक कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीनंतर टावरे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार होते; मात्र राष्ट्रवादीच्या दोन गटांनी येथे गोंधळ घातला. टावरे यांनी पहिले माझ्याकडे यावे, असा हट्ट केल्याने टावरेंची कोंडी झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना नाराज न करता ते आधी शहराध्यक्षांकडे गेले आणि नंतर दुसºया गटाच्या पदाधिकाºयांची भेट घेतली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंच्या विविध गटांतील पदाधिकाºयांची भेट घेण्यासाठी टावरे हे बदलापुरात आले होते. ब्लॉक कार्यालयात कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर ते शहरातील इतर पदाधिकाºयांची भेट घेण्यासाठी जाणार होते; मात्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख आणि राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे अविनाश देशमुख या दोघांनीही पहिले माझ्यासोबत चला, असा हट्ट टावरे यांना केला. नेमके कोणाबरोबर आधी जायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कालिदास देशमुख यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जायचे की, अविनाश देशमुख यांनी रिपाइंच्या एका पदाधिकाºयासोेबत ठेवलेल्या बैठकीला जायचे, याबाबत निर्णय घेताना टावरे यांनादेखील अडचण निर्माण झाली.ठरलेल्या कार्यक्रमानुसार आधी कालिदास देशमुख यांच्याकडे जाण्याचा आणि त्यानंतर लागलीच अविनाश देशमुख यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. टावरे यांच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरूच होती. अखेर, टावरे यांनीच सर्व कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे ब्लॉक कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला नव्या, जुन्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसbadlapurबदलापूर