Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 21:01 IST2026-01-06T21:00:41+5:302026-01-06T21:01:40+5:30
Navi Mumbai Water Cut: सिडकोने साई गावाजवळील हेतवणे पाइपलाइनच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नवी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
Navi Mumbai Water Cut:नवी मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोने साई गावाजवळील हेतवणे पाइपलाइनच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे बुधवार, ७ जानेवारी रोजी शहराच्या विविध भागांत सलग ७ तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚰 पाणीपुरवठा बंदची महत्त्वाची सूचना 🚰
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) January 6, 2026
साई गावाजवळील हेटवणे पाईपलाईनवर आपत्कालीन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे,
🗓️ ०७ जानेवारी २०२६ (बुधवार)
⏰ सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
खालील नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील ⬇️
📍 खारघर, तळोजा, उलवे व द्रोणागिरी pic.twitter.com/Q32ll53E1Z
सिडकोने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी या भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ६:०० वाजेनंतर पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत केला जाईल. मात्र, सुरुवातीला हा पुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबईकरांना गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी १९ डिसेंबर रोजी वायल आणि थोंबरेवाडी येथील मुख्य पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सातत्याने होणाऱ्या या तांत्रिक कामांमुळे नागरिकांमधून काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.