Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:19 IST2025-09-18T15:18:50+5:302025-09-18T15:19:42+5:30

Navi Mumbai Crime News: 12 वर्षाच्या मुलीची आई कामावर गेलेली असताना आरोपी घरी गेला. त्यानंतर मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला आणि धमकी देत बलात्कार केला. 

Navi Mumbai: 'Take off your clothes or I will kill your brother'; 12-year-old girl taken home and raped, incident in Navi Mumbai | Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai Latest Crime News: 12 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन जात एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला घरी नेल्यानंतर आरोपी तिला म्हणाला की, कपडे काढ नाहीतर तुझ्या भावाला संपवेन. त्यामुळे मुलगी घाबरली. त्यानंतर त्याने अत्याचार केला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर मुलीने हा सगळा प्रकार सांगितला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नवी मुंबईतील नेरूळमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीची आई कामावर गेलेली होती. मुलगी घरी एकटीच होती. त्याचवेळी ओळखीतलच आरोपी घरी आला. तो मुलीला स्वतःच्या घरी घेऊन गेला. 

तुझ्या भावाला मारेन

घरी गेल्यानंतर आरोपीने अचानक तिला कपडे काढायला सांगितले. मुलगी घाबरली. त्यानंतर आरोपी म्हणाला, कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन. त्यामुळे मुलीला काही कळले नाही. त्यानंतर आरोपीने धमकी देत दबाव टाकून कपडे काढायला लावले आणि तिच्यावर बलात्कार केला. 

आईला बसला धक्का

आई घरी आल्यानंतर मुलगी रडायला लागली. त्यानंतर तिने घडलेली सगळी घटना आईला सांगितली. हे ऐकून आईला धक्काच बसला. तिने मुलीला सोबत घेत नेरूळ पोलीस ठाणे गाठले. 

पोलिसांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. तिथे तिच्या अत्याचार करण्यात आला असल्याच निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी केली जात आहे. अधिकचे पुरावेही शोधले जात आहे. मुलीला मानसिक धक्का बसला असून, तिचे समुपदेशनही केले जाणार आहे. 

Web Title: Navi Mumbai: 'Take off your clothes or I will kill your brother'; 12-year-old girl taken home and raped, incident in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.