नवी मुंबई : खेळण्यांच्या दुकानाला आग, दुकानावरील खोलीत राहणा-या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:54 IST2018-02-15T10:18:35+5:302018-02-15T10:54:06+5:30

ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी दुकानाला लागलेल्या आगीमध्ये माय-लेकीचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री 3.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.

Navi Mumbai: The fire in the toy store, 2 dead | नवी मुंबई : खेळण्यांच्या दुकानाला आग, दुकानावरील खोलीत राहणा-या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबई : खेळण्यांच्या दुकानाला आग, दुकानावरील खोलीत राहणा-या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी दुकानाला लागलेल्या आगीमध्ये माय-लेकीचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री 3.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. दरम्यान, यावेळी पोटमाळ्याच्या खिडकीमधून 1 वर्षाच्या मुलाला खाली फेकून जमावावे झेलल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. ऐरोली सेक्टर क्रमांक 3 येथे ही घटना घडली. गायत्री चौधरी (5 वर्ष) व मंजू चौधरी (25 वर्ष)  अशी मृतांची नावं आहेत. 

चौधरी यांच्या राहत्या घराच्या खाली खेळण्यांचे दुकान होते. तर पोटमाळ्यांवर 5 ते 6 जणांचे चौधरी कुटुंब राहत होते.  दुकानात आग लागल्याचे समजताच पुरुषांनी पोटमाळ्याच्या खिडकीतून उड्या मारुन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दीड वर्षांच्या मुलाला देखील खिडकीतून खाली फेकून जमलेल्या जमवाने त्याला झेलल्यानं त्याचा जीव बचावला. मात्र, याचवेळी माय लेकीचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.  



 



 

Web Title: Navi Mumbai: The fire in the toy store, 2 dead