शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे मुकादम निलंबित

By admin | Updated: August 19, 2015 02:22 IST

पनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या चांगलाच

प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या चांगलाच अंगलट आला आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी अचानक दिलेल्या भेटीत एकही कामगार न आढळल्याने त्यांनी मुकादमांना निलंबित केले. त्याचबरोबर एकूण तेवीस कामगारांवर एक दिवस विनावेतनाची कारवाई केली आहे.पालिकेच्या हद्दीतील पनवेल शहर, तक्का, धाकटा आणि मोठा खांदा या परिसरांची साफसफाई करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. एकूण क्षेत्रफळ त्याचबरोबर कामगारांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे. पालिकेच्या सफाई कामगारांनी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत काम करणे अपेक्षित आहे. मात्र कित्येकजण कामचुकारपणा करतात. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडून आरोग्य धोक्यात येत आहे. मुख्याधिकारी मंगेश चितळे आणि अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी पदभार घेतल्यापासून दांडी, लेटलतिफ त्याचबरोबर मधूनच गुल होणाऱ्या कामगारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. विशेषत: पालिकेपासून धाकटा आणि मोठा खांदा दूर असल्याने तेथील सफाई कामगार पूर्णवेळ काम न करता मधूनच पळ काढत असल्याच्या अनेकदा तक्र ारी येत होत्या. यात मुकादमांचे साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. १४ आॅगस्टला अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी या दोन्ही ठिकाणी अचानक भेट दिली. त्यावेळी येथे सफाई कामगार काम करताना आढळले नाही. त्याचबरोबर मुकादम व सहाय्यक मुकादमही बेपत्ता होते. पंडित यांनी त्वरित आरोग्य सभापती गणपत म्हात्रे यांना कळवले असता, मुकादमाने गटारीकरिता कामगारांना सोड़ून दिल्याची माहिती मिळाली. एकूण २३ कामगारांना त्या दिवशीचे वेतन न देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. मुकादम सूर्यभान काळे आणि सहाय्यक मुकदाम संतोष गायकवाड यांना निलंबित केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.