शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वडाळे तलावाजवळील घर पालिकेने तोडले

By admin | Updated: January 12, 2017 06:26 IST

पनवेल महापालिकेच्या वडाळे तलावात गेली कित्येक वर्षे बांधलेले घर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने बुधवारी जमीनदोस्त केले.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वडाळे तलावात गेली कित्येक वर्षे बांधलेले घर पालिकेच्या अतिक्र मण विभागाने बुधवारी जमीनदोस्त केले. मात्र, तलावाच्या आतील भागात असणारे हे घर पाडण्यात आले, तर तलावाच्या आजूबाजूला जवळपास ३०हून अधिक ठिकाणी अतिक्र मण करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्यावर पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पनवेलच्या वडाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे १९८६मध्ये घर बांधले असल्याचे दत्तात्रेय गायकर यांचे म्हणणे आहे. तसेच या घराचे १२० रु पये घरभाडे देखील भरत असल्याचे गायकर यांनी सांगितले. या तलावाचा भाडेपट्टा ४ हजार २०० रु पये असून, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केवळ सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप या वेळी गायकर कुटुंबीयांकडून करण्यात आला. आम्ही या तलावात हजारो मासे सोडले आहेत. त्यामुळे होणारे नुकसान लाखोंच्या घरात आहे. पालिकेने आमचे राहते घर तोडल्याने आमचे पुनर्वसन करावे व आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी दत्तात्रेय गायकर यांनी केली आहे. या वेळी बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. वडाळे तलावातील घर तोडण्यासाठी जेसीबी आणताना येथील चार ते पाच झाडेही जेसीबीने तोडून टाकली. त्यामुळे पालिका एकीकडे वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा सामाजिक संदेश देते आणि दुसरीकडे अतिक्र मणाची कारवाई करताना झाडांचे नुकसान करते. त्यामुळे ही झाडे तोडल्याबद्दल आयुक्तांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)