शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पात नोंदणीसाठी मोबाइल अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:26 IST

गेल्या महिन्यात सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मेगा गृहप्रकल्पातील घरासाठी अर्ज करणे आता अधिक सुलभ होणार आहे.

नवी मुंबई : गेल्या महिन्यात सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मेगा गृहप्रकल्पातील घरासाठी अर्ज करणे आता अधिक सुलभ होणार आहे. अर्ज भरताना नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन सिडकोने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर व सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी १४,८३८ घरांच्या मेगा गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. १३ आॅगस्ट २0१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, तर १५ आॅगस्टपासून या घरांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. सिडकोने पहिल्यांदाच घरासाठी आॅनलाइन अर्ज मागविल्याने नागरिकांत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. सायबर कॅफे किंवा तत्सम ठिकाणी जाऊन अर्ज भरावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची धावपळ होत आहे. नागरिकांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, यादृष्टीने सिडकोने या योजनेसाठी मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. सिडको आॅनलाइन २0१८ असे या अ‍ॅपचे नाव असून त्याद्वारे स्वत:चा फोटो काढणे, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा धनादेशाची माहिती स्कॅन करून अपलोड करणे शक्य होणार आहे.या अ‍ॅपमुळे घरासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.