शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एमजेपीला पनवेल पालिकेची मदत

By admin | Updated: December 7, 2015 00:57 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता सिडको, जेएनपीटीबरोबर पनवेल नगरपालिका सुध्दा हातभार लावणार आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याकरिता सिडको, जेएनपीटीबरोबर पनवेल नगरपालिका सुध्दा हातभार लावणार आहे. पालिका प्रशासन याकरिता २८ कोटी निधी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुध्दीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान ३० वर्षांपूर्वी ११५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या वाहिनीव्दारे पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे खारघर व आजूबाजूच्या १४ गावांतील सुमारे १५ लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पळस्पे फाटा येथून टी पॉइंट काढून जेएनपीटीलाही पाणी दिले जाते, आजूबाजूची गावेही यावर अवलंबून आहेत. परंतु ही वाहिनी अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली आहे. परिणामी पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहे, शिवाय सुमारे ३० किमी अंतर असलेल्या या जलवाहिनीलगत अनेक अनधिकृत झोपड्या तयार झाल्या आहेत. येथील झोपडपट्टीवासीय पाण्यासाठी अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आसुडगाव, भिंगारी, पोदी, नवीन पनवेल, करंजाडे, वडघर, बंबईचा पाडा या ठिकाणी जलवाहिनी फोडली जात आहे. त्या ठिकाणा वारंवार मलमपट्टी केली तरी दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फोडली जात आहे. पाणीगळती आणि चोरी प्रकरण रोखण्यासाठी या वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. मात्र या विभागाकडे निधी नसल्याने जुनाट वाहिन्यावरून तहान भागविली जात आहे. त्यामुळे जवळपास २५ टक्क्यापेक्षा जास्त पाणी गळती होत आहे.जलवाहिन्या बदलण्याकरिता एमजीपीने १९६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याकरिता सिडको १४४, पनवेल नगरपालिका २८, जेएनपीटी ४६ कोटी निधी देणार आहे. तसा करारनामासुध्दा तयार केला आहे. नगरपालिकेला अमृत योजनेंतर्गत निधी मिळणार आहे. ५० टक्के केंद्र शासन आणि प्रत्येकी २५ टक्के राज्य शासन व पनवेल नगरपालिका निधी देणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले.