शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

कासू सब-वेसाठी शुक्रवारी कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक

By admin | Updated: January 7, 2015 02:01 IST

दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

मुंबई : दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे. कासू येथील सब-वेच्या कामासाठी ९ जानेवारी रोजी मेगाब्लॉकही घेतला जाणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. पेण ते कासू आणि कासू ते रोहापर्यंतचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. पेण ते कासू दरम्यानच्या दुहेरी मार्गासाठी मध्य रेल्वेकडून सप्टेंबर २0१४मध्ये पाच तासांचा मेगाब्लॉकही घेण्यात आला होता. यामध्ये तांत्रिक कामे पूर्ण केली गेली. पेण ते रोहामधील आप्टा ते कासूदरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कासू ते रोहा या २६ किलोमीटर्सचे काम बाकी राहणार आहे. तेदेखिल लवकरच पूर्ण केले जाईल. कासू येथे सब-वेच्या कामासाठी ९ जानेवारी रोजी पाच ते सहा तासांचा मेगाब्लॉकही घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी पॅसेंजरसह अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावण्याबरोबरच रद्दही होण्याची शक्यता आहे.