शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचा महापौर १० जुलैला ठरणार!

By admin | Updated: July 4, 2017 07:00 IST

निवडणूक होऊन महिना उलटला आहे. मात्र, तरीही पनवेलचा महापौर निश्चित करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : निवडणूक होऊन महिना उलटला आहे. मात्र, तरीही पनवेलचा महापौर निश्चित करण्यात आलेला नाही. यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले असून, महापौरांबाबत पनवेलकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या १० जुलैला महापालिकेची पहिली विशेष महासभा घेऊन महापौर, उपमहापौर यांची निवड होणार आहे. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर म्हणजेच २६ मे रोजी महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. ७८पैकी भाजपाने बहुमताचा ५१ नगरसेवकांचा आकडा गाठला. शेकाप-२३, काँॅग्रेस-२, राष्ट्रवादी-२ तर शिवसेनेला आपले खाते उघडताही आले नाही. निवडणुकीनंतर गटनेता निवडीत राजकीय परंपरा पाहायला मिळाली. भाजपाच्या गटनेतेपदी परेश ठाकूर यांची वर्णी लावण्यात आली. महाआघाडीतही माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांना गटनेतेपद देऊन राजकीय वारसा पुढे चालू ठेवला. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. महापौर, उपमहापौरांना बसण्यासाठी दालने नसल्यामुळे महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली नाही. अखेर महापौरपदाच्या निवडीसाठी १० जुलै ही तारीख निश्चित केली आहे. महापालिकेच्या फडके नाट्यगृहात पहिली विशेष महासभा होणार असून, रायगडचे जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सभेत महापौर, उपमहापौर, स्वीकृत सदस्य यांच्या निवडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. नवनियुक्त नगरसेवकांना या महासभेविषयी पत्र पाठवून कळविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नवनियुक्त नगरसेवकांना सभाशास्त्र, सभेचे नियम, नगरसेवकांचे अधिकार याची माहिती देण्यासाठी सोमवारी फडके नाट्यगृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात महासभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे आठ दिवसांनी पनवेलचा पहिला महापौर ठरलेला असेल, हे निश्चित झाले आहे.