शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पूजेच्या साहित्याने बाजारपेठ खच्चून भरली

By admin | Updated: September 14, 2015 03:46 IST

गणपती बाप्पाला लागणाऱ्या पूजेच्या सामानानेही बाजारपेठ खच्चून भरली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत या सामानाच्या दरांमध्ये १५ ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे.

भाग्यश्री प्रधान, ठाणेगणपती बाप्पाला लागणाऱ्या पूजेच्या सामानानेही बाजारपेठ खच्चून भरली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत या सामानाच्या दरांमध्ये १५ ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च तसेच कारागिरांची मजुरी आणि कच्चा माल महाग झाल्याने ही वाढ झाली आहे. या पूजेच्या सामानामध्ये हळदकुंकू, अगरबत्ती, जानवेजोड, कापूर, धूप, सुपारी, विड्याची पाने आदी गोष्टींचा समावेश आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अगरबत्ती, धूप व कापूर या गोष्टींना दरवर्षीच मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागच्यावर्षी ९० रुपयांना मिळणारी अगरबत्ती यावर्षी १२० रुपयांना मिळत असून १०० ग्रॅम केवडा, पानडी, मोगरा अगरबत्ती ३० रुपयांना मिळत आहे.तसेच विक्रेते प्रसाद प्रधान यांनी गणपतीसाठी दोन वर्षांपासून खास लांब अगरबत्ती विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले. ही अगरबत्ती चार ते पाच तास जळते आणि तिच्या सुगंधामुळे वातावरणही भक्तिमय होते.तसेच १०० ग्रॅम मसाला अगरबत्ती ९० ते १०० रुपयांना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. धूपांमध्येही चामुंडाय, विनायक, रॅडो धूप कॅण्डीची बाजारात चलती आहे. तर, १०० ग्रॅम साधा धूप साधारण ५० रुपयांपर्यंत मिळत आहे. अत्तराच्या छोट्या कुपीलाही गिऱ्हाइकांची मागणी जास्त प्रमाणात असते, असे विक्रेत्यांनी सांगितले. या अत्तरांमध्ये मोगरा, केवडा, जस्मीन,रोज, सोनचाफा आदी प्रकार असून या अत्तराची किंमत १० पासून १५० रुपयांपर्यंत आहे. खारीक, बदाम, आक्रोड, हळकुंड, सुपारी आदी पदार्थ एकत्र करून बनविलेले पाकीट ५० रुपयांना बाजारात मिळत आहे. काही जण गणेशोत्सवादरम्यान सत्यनारायण पूजा घालत असल्याने सत्यनारायणाला लागणारे सर्व पूजा साहित्य एकत्र करून सेट तयार केला जातो. हा सेट ५०० ते १५०० पर्यंत विकत असल्याचे विक्रेते प्रतीक विव्दांस यांनी सांगितले. काही दुकानदार हळदकुंकू कोल्हापूरवरून मागवितात. या कुंकु वामध्ये हळदीचा इसेन्स टाकला जातो, त्यामुळे हे कुंकू कपाळाला लावल्यानंतर कोणतीही अ‍ॅलर्जी होत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.