शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बॅचसाठी मराठी तरुणांची अडवणूक

By admin | Updated: January 7, 2016 01:01 IST

परप्रांतीय नागरिकांना पुरेसे पुरावे नसताना रिक्षा चालविण्याचा बॅच तत्काळ मिळत असताना मराठी तरुणांना मात्र तीन ते चार महिने ताटकळावे लागत आहे

नवी मुंबई : परप्रांतीय नागरिकांना पुरेसे पुरावे नसताना रिक्षा चालविण्याचा बॅच तत्काळ मिळत असताना मराठी तरुणांना मात्र तीन ते चार महिने ताटकळावे लागत आहे. नेरूळ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरपासून एका तरुणाला चारित्र्य पडताळणीसाठी हेलपाटे मारावयास लावले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण प्रत्येक वर्षी रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये येतात. सुशिक्षित असूनही चांगली नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण रिक्षा चालवून किंवा वाहनचालकाची नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यामुळे रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या अनेकांना परमिट मिळण्याची आशा वाटू लागली आहे. अनेकांनी जूनपासून रिक्षा परमिटसाठी अर्ज केले आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सप्टेंबरमध्ये रिक्षा परवान्यासाठी अर्ज केला होता. आरटीओ विभागाने ३ सप्टेंबरला त्याच्या चारित्र्य पडताळणीसाठी त्याचा अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविला. आयुक्तालयातून नेरूळ पोलीस स्टेशनकडे वर्ग केला. नेरूळ पोलिसांनी अर्जदार दिलेल्या पत्त्यावर राहतो काय, त्याचे स्वत:चे घर आहे की भाडेतत्त्वावर, घर भाड्याने असल्यास त्याची नोंद पोलिसांकडे आहे का , त्याचे यापूर्वीचे वास्तव्याचे ठिकाण व मूळ गावचा पत्ता, त्याच्यावर काही गुन्हे आहेत का याची चौकशी करून तो अहवाल आरटीओकडे देणे आवश्यक होते.नेरूळ पोलिसांकडे या तरुणाने पाठपुरावा करूनही त्याला अद्याप चारित्र्य पडताळणी अहवाल दिलेला नाही. त्याने पोलिसांना स्वत:च्या नावाचे वीज बिल, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका दिली आहे. परंतु यानंतरही पोलीस वारंवार अर्जातील त्रुटी काढू लागले आहेत. मालमत्ता कर भरल्याची पावती द्या, सोसायटीचा ना हरकत परवाना द्या या सर्व गोष्टी दिल्या नाहीत तर चारित्र्य पडताळणी अर्ज दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.