शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीवर महिलाराज

By admin | Updated: March 15, 2017 02:37 IST

रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणुका पार पडल्या. १५ पैकी आठ पंचायत समित्यांवर महिला सभापती

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणुका पार पडल्या. १५ पैकी आठ पंचायत समित्यांवर महिला सभापती विराजमान झाल्या आहेत. अलिबाग पंचायत समितीवर शेकापच्या प्रिया पेढवी सभापती, तर उपसभापतीपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.सकाळी अकरा वाजता सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अलिबाग तालुक्याचे पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. अलिबाग तालुक्यातील १४ पैकी आठ जागा या शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने काबीज केल्या, तर सहा जागा या काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्या युतीला मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस युती जिंकणार हे स्पष्ट होते. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नसल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीने आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते.शेकापने सभापतीपदासाठी प्रिया पेढवी यांना, तर उपसभापती प्रकाश पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीने अनुक्रमे ताई गडकर आणि उदय काठे यांना निवडणुकीत उभे केले होते.शेकापच्या सभापतीपदाच्या उमेदवार प्रिया पेढवी यांच्या उमेदवारीवर आघाडीच्या उमेदवार ताई गडकर यांनी आक्षेप घेतला. प्रिया पेढवी यांच्याकडे अनुसूचित जमातीच्या जातपडताळणीचे प्रमाणपत्र नाही, तसेच त्यांची जात वैधता ही पडताळणी समितीमार्फत फेटाळण्यात येणार असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, असा आक्षेप ताई गडकर यांनी घेतला होता. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नियम १९६२ नुसार तसेच अन्य सुधारणांप्रमाणे उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज केला असेल, त्याबाबतची पोच पावती असेल, तसेच त्याबाबतचे शपथपत्र जोडलेले असले, तरी तो उमेदवार निवडणूक लढवू शकतो. परंतु त्या उमेदवाराने सहा महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याची कायद्यामध्ये तरतूद असल्याचे अलिबागचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी सांगितले. कायद्यानुसार प्रिया पेढवी यांना निवडणूक लढविता येत असल्याने गडकर यांचा आक्षेप अर्ज फेटाळण्यात असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)