शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

Maharashtra Rain Updates : उमरोली गावाचा संपर्क तुटला, गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 4:18 PM

गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे.

ठळक मुद्देगाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला आहे.

मयूर तांबडे

पनवेल - गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाला जोडणाऱ्या स्वातंत्रपूर्व काळापासून असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा पूल यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तयार होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. परिणामी पूल अद्याप अर्धवट स्थितीतच आहे. 

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. तर नवीन पूल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला पाया देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. तर गावात प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने उमरोली गावातील चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. अनेकजण सकाळीच कामानिमित्ताने गावाबाहेर आले असता, ते परत घरी पोहचू शकलेले नाहीत. यामुळे पावसाळ्या पूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तसे न झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा संताप उमरोली गावातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. 

बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

सोमवारी (8 जुलै) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. या नाल्यांच्या मार्गात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने त्यामधील पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. तर काही ठिकाणी रहिवाशी भागात पाणी शिरले आहे. अशाच प्रकारातून तुर्भे एमआयडीसी येथील बोनसरी गावात सकाळपासूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या नाल्याने पाण्याची पातळी ओलांडल्याने नाल्याला नदीचे स्वरूप आले आहे. हे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरल्याने घरांमध्ये सुमारे दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलRainपाऊसriverनदीMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट