महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याचा अटकेपार झेंडा; सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१चे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 04:41 PM2021-03-24T16:41:30+5:302021-03-24T16:41:58+5:30

Maharashtra Police : ष्ट्रीय मास्टर एशिया श्री 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भरतीय संघातून झाली आहे.

Maharashtra police officer's flag across; Subhash Pujari became the master of Master Bharat Shri 2021 | महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याचा अटकेपार झेंडा; सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१चे मानकरी

महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याचा अटकेपार झेंडा; सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१चे मानकरी

googlenewsNext
ठळक मुद्देसुभाष शंकर पुजारी हे सहा पोलीस निरीक्षक म्हणून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणुन कर्तव्यावर आहेत.

वैभव गायकर 

पनवेल - इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांचे वतीने दि.२० व २१ मार्च दरम्यान लुधियाना पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर ,दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पीयन शीप २०२१ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टिम मधू. खेळताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी भारत श्री 2021 किताबावर आपला वर्चस्व मिळवत स्वतःसह संपूर्ण महाराष्ट्रपोलिसांचे नाव देशपातळीवर अभिमानाने फडकविला आहे.
          

हा किताब फडकविणार पुजारी हे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत.मास्टर भारत श्री 2021 खेळताना 80 किलो वजनी गटात  सुभाष पुजारी यांनी  गोल्ड मेडल पटकावले आहे.ही बाब महाराष्ट्र पोलीस खात्याची मान  वाढविणारी आहे. त्यांच्या या यशाबददल पोलीस खात्यामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.दि.०१ ते ०७ सप्टेंबर २०२१ दरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारतचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भरतीय संघातून झाली आहे.

सुभाष शंकर पुजारी हे सहा पोलीस निरीक्षक म्हणून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणुन कर्तव्यावर आहेत. त्यांनी महामार्ग पोलीस विभागातमुंबई पुणे द्रुतगर्ती मार्गावर वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी वेगवेगळी उपक्रम राबवून महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्याचे काम केले आहे. कोल्हापुर येथे नैसर्गिक आपर्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुर वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशा वेळी त्यांनी आपला समाजातील असलेला जनसंपर्क, मित्रमंडळी व महामार्ग पोलीस पळस्पे नवी मुंबई यांचेकडून कोल्हापुर येथील ६०० कुटुंबियांना किमान ८ दिवस पुरेल इतका राशन पुरवठा केला होता. त्याचबरोबर कोरोना काळात महामार्ग पोलीस व त्यांचे कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होवू नये त्याकरीता आपला जनसंपर्क वापरून सॅनिटायझर, मास्क, शिल्ड , हॅन्ड ग्लोज, पावसाळी रेनकोट, विंटर रिप्लेक्टर जॅकेट इत्यादी साहीत्य साधनसामुग्री उपलब्ध करून संपूर्ण महाराष्ट्रातील महामार्ग पोलीसांना पुरविले होते.सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असलेले पुजारी यांनी पोलीस सेवेत राहून एक नव्या यशाला गवसणी घातली आहे.

Web Title: Maharashtra police officer's flag across; Subhash Pujari became the master of Master Bharat Shri 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.