शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला मुलगा दोन वर्षांनी सापडला

By admin | Updated: November 12, 2015 02:49 IST

जत्रेसाठी गावी जाण्याचा हट्टाने घर सोडल्याने हरवलेल्या मुलाचा दोन वर्षांनी शोध लागला आहे. कर्नाटकला जाणाऱ्या गाडीऐवजी तो दुसऱ्याच गाडीत बसल्याने हैदराबादला पोचला होता.

नवी मुंबई : जत्रेसाठी गावी जाण्याचा हट्टाने घर सोडल्याने हरवलेल्या मुलाचा दोन वर्षांनी शोध लागला आहे. कर्नाटकला जाणाऱ्या गाडीऐवजी तो दुसऱ्याच गाडीत बसल्याने हैदराबादला पोचला होता.तुर्भे येथील हनुमान नगरमध्ये राहणारा संतोष धोत्रे (१०) सप्टेंबर २०१३ मध्ये हरवला होता. जत्रेसाठी गावी चाललेल्या आजोबांना सोडण्यासाठी तो कुटुंबासोबत तुर्भे नाका येथे आला होता. त्यालाही जत्रेसाठी गावी जायचे होते, मात्र घरच्यांनी पाठवले नव्हते. त्यामुळे आजोबांनाा सोडल्यानंतर घरी जात असताना तो पळून गेला होता. उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे तो हरवल्याची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलीसांकडे करण्यात आली होती, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्याच्या तपासाला सुरवात केली. यानुसार संतोष धोत्रे नावाचा मुलगा कोणत्या बालसुधारगृहात आहे का, याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान कर्नाटकमधील कुलबर्गी येथील बालसुधारगृहात एक संतोष नावाचा अल्पवयीन मुलगा असून तो मराठी बोलत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक रुपाली पोळ यांचे पथकाने तिथे जाऊन मुलाची चौकशी केली. शिवाय त्याच्या पालकांशीही भेट घालून दिली असता, तो हरवलेला संतोषच असल्याचे समजले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी हरवलेला संतोष परत मिळाल्याने त्याच्या कुटूंबीयांची दिवाळी खऱ्या अर्थाने सुखद झाली. याबाबत त्यांनी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्यासह दिघे यांच्या संपुर्ण पथकाचे त्यांनी आभार मानले आहेत.हैदराबादला पोचल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्याला तिथल्या बालसुधारगृहात दाखल केले. त्याने आपण कर्नाटकचे असल्याचे सांगितल्यानंतर त्याला कुलबर्गा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. पत्ता माहीत नसल्यामुळे तो तिथेच राहत होता असे पोलीस निरिक्षक पुष्पलता दिघे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)