शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाने संघटित होण्याची गरज, वाशीत मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:53 IST

कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

नवी मुंबई - कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या समस्या निकाली काढण्यासाठी कुणबी समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या वतीने वाशीत, कुणबी समाजाच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यास विविध जिल्ह्यांतील कुणबी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष भूषण बरे, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष अविनाश लाड, युवा अध्यक्ष माधव कांबळे, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते. कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे वास्तव्य असूनही, त्यांना स्वत:च्या समस्यांचे गाºहाणे मांडण्यासाठी हक्काचा एकही लोकप्रतिनिधी नाही. आजही त्यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तर इतर लोकप्रतिनिधींकडून कुणबी समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. समाजाचे बहुतांश तरुण उच्चशिक्षित असतानाही त्यांच्यापुढेही नोकरी व्यवसायाच्या समस्या आहेत, त्यामुळे कुणबी समाजाने संघटित होण्याचे आवाहन समाजोन्नती संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी समाजासाठी राजकीय सत्तेचे दार उघडण्याकरिता एकजूट होण्याचेही आवाहन करण्यात आले. तसेच कुणबी समाजाच्या भावना मांडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना संघाच्या वतीने पत्र पाठवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. समाजातील व्यक्ती जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये कार्य करत असतील, त्यांनी कुणबी समाजाच्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली. असे झाले तरच समाजाचा पाया भक्कम होऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या निकाली लागतील, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. शहरी भागात वास्तव्य करणारा कुणबी समाज जागरूक झालेला आहे; परंतु ग्रामीण भागात अद्यापही मत परिवर्तनाची गरजही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या