शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-पनवेल एसटीचा प्रवास धोकादायक

By admin | Updated: March 23, 2017 01:35 IST

कर्जत-पनवेल रस्त्यावर धावणाऱ्या एका एसटीच्या स्टार्टरला चार दिवसांपूर्वी आग लागली होती, ही आग विझवण्यासाठी गाडीत

कर्जत : कर्जत-पनवेल रस्त्यावर धावणाऱ्या एका एसटीच्या स्टार्टरला चार दिवसांपूर्वी आग लागली होती, ही आग विझवण्यासाठी गाडीत अग्निरोधक यंत्रणा नव्हती. कोणताही मोठा प्रकार झाला नाही. मात्र, कर्जत-पनवेल एसटीचा प्रवास धोकादायक आहे. याबाबतचे निवेदन प्रवाशांसह भारतीय जनता पार्टीच्यावतीने एसटी आगारास देण्यात आले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.१६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेल स्थानकातून कर्जतला यायला एसटी सुटली. शेडुंग टोलनाका येथे या एसटीच्या स्टार्टरला आग लागली. एसटीत ५०-६० प्रवासी होते. प्रत्यक्षदर्शी आग विझवण्यास मदत करणारा विद्यालयीन विद्यार्थी अथर्व अनिल जोशी याने माहिती सांगितली. या घटनेची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा कल्पना दास्ताने, जिल्हा उपाध्यक्षा स्मिता घरलुटे, स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, स्नेहा पिंगळे, लीना गांगल, प्रशांत उगले, विद्यार्थी अथर्व अनिल जोशी यांनी कार्यशाळा अधीक्षक भालचंद्र लाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची संखा जास्त असून, पनवेलकडे धावणाऱ्या गाड्या सुस्थितीत नसतात.गाड्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही, त्यांची माहिती कर्मचाऱ्यांना नाही, काही जागरूक नागरिक तक्रार करायला गेल्यावर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, तसेच तक्र ार नोंदण्यासाठी तक्र ार बुक मागितल्यावर तीही देत नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे तरी एसटीचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून गाड्या सुस्थितीत असाव्यात, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मोठ्या गाड्या सोडाव्यात आणि गाडीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवून त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे अशा मागण्या या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.(वार्ताहर)