शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:54 IST

ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली

अजित मांडके,  ठाणेठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली असली तरी आता हा पर्याय सुरु होण्यापूर्वीच रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरीत लवादाने संजय गांधी नॅशनल पार्क परिसरापासून १० किमीपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम या पर्यायी मार्गावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सहा पदरी टनेलसाठी सुमारे ४ हजार कोंटीचा खर्च केला जाणार असून, हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून आता पुढील मंजुरीसाठी वनविभाग, पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणि वन्यजीव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण टनेल वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने हा सुरक्षित मार्ग मानला जात होता. परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे हा मार्ग कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाबाबत ठाण्यात सध्यातरी संभ्रमाचे वातावरण असून हे अंतर १०० मीटर का १० किमी याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु १० किमी असले तरी किंवा १०० मीटर असले तरी देखील या दोन्ही मुद्यांवरुन या महत्त्वाच्या प्रकल्पात मात्र अडथळेच निर्माण होणार आहेत. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली आहे, त्याचे अद्याप डिझाइन तयार नाही. तसेच वन विभागासह विविध माध्यमांच्या परवानग्यादेखील घेणे शिल्लक आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात १० किमी पर्यंत बांधकामांना बंदी घातल्याची वृत्त धडकताच शहरात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाण्यात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार असा कोणताही नवा आदेश सध्या प्राप्त त्यांना झाला नाही. मात्र, जुलैमध्ये आलेल्या आदेशानुसार १०० मीटर परिसराच्या आत कोणतेही बांधकाम करता येऊ शकणार नाही. परंतु १० किमी पर्यंतचे आदेश सध्या तरी प्राप्त झालेले नाहीत. १० किमीपर्यंत आदेशात वाईल्ड लाईफची परवानी घेण्याचे बंधन असू शकते, असाही कयास प्रशासनाने लावला आहे.