शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:02 IST

राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उभारणाºया कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही, हे स्पष्ट आहे

नवी मुंबई : राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उभारणाºया कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. असे असतानाही शहरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. भूमाफियांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे.  विशेषत: गाव-गावठाणात फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांनी जोर धरला आहे. या बांधकामांना प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान सिडको आणि महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. भूमाफियांनी स्थानिकांना हाताशी धरून मोकळ्या जागा बळकावून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत.   गरजेपोटीच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा प्रश्न सिडको आणि महापालिकेसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. परंतु राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. नवी मुंबईतील जवळपास वीस हजार बांधकामांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे २0१५ नंतर उभारलेल्या बांधकामांवर महापालिका व सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. इतकेच नव्हे, तर नवीन बांधकामे उभारू नयेत, यादृष्टीनेही उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु सिडको व महापालिकेकडून करण्यात येणाºया उपाययोजना तोकड्या ठरताना दिसत आहेत. कारण आजही गाव-गावठाणात बिनदिक्कत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना रोक लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

  • कारवाईचा धडाका 

महापालिका आणि सिडकोने २0१५ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी सिडकोने ऐरोली सेक्टर ९ व १0 मधील चाळीस अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर कारवाई केली. तर मंगळवारी महापालिकेने बेलापूर-शहाबाज येथील बांधकाम सुरू असलेल्या एका दोन मजली इमारतीवर बुलडोझर फिरविला. एकीकडे कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे बांधकामांचा धडाका सुरू असल्याने दोन्ही प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.