अश्लील व्हिडीओ अन् मामा-भाचीचं गुपित; पत्नीच्या 'त्या' कृत्यामुळे पतीने टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:14 IST2026-01-03T14:55:08+5:302026-01-03T16:14:45+5:30
रबाळेमध्ये मामासोबतच्या संबंधांतून पत्नीने पतीला त्रास देत त्याला स्वतःला संपवायला भाग पाडलं.

अश्लील व्हिडीओ अन् मामा-भाचीचं गुपित; पत्नीच्या 'त्या' कृत्यामुळे पतीने टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवली
Navi Mumbai Crime: सोशल मीडियाचा वापर माणसांना जोडण्यासाठी होतो, पण रबाळेत याच माध्यमाचा वापर एका तरुणाचा मानसिक बळी घेण्यासाठी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी आणि तिच्या मामाकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला आणि सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या अश्लील व्हिडिओंना कंटाळून विनोद श्रीमंत तुपसौंदर (२७) या तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रबाळे येथील साई नगरमध्ये राहणाऱ्या विनोदचा विवाह जून २०२५ मध्ये नाशिकच्या महिलेशी हिच्याशी झाला होता. संसाराची नवी स्वप्ने पाहत असलेल्या विनोदच्या आयुष्यात काही दिवसांतच मिठाचा खडा पडला. महिलेचे तिच्या मामाशी, संतोष ढगे याच्याशी असलेले वारंवार चॅटिंग आणि जवळीक विनोदला खटकत होती. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते.
दोघांमधील वाद मिटवण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी मुलीकडची मंडळी रबाळेत आली होती. मात्र, वाद मिटण्याऐवजी तो अधिकच विकोपाला गेला आणि महिला आपल्या माहेरी निघून गेली. खरी धक्कादायक बाब त्यानंतर घडली. महिला घर सोडून गेल्यावर विनोदच्या इन्स्टाग्रामवर अचानक त्याच्या पत्नीचे काही अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले. हे व्हिडीओ मामा संतोष ढगे यानेच विनोदला मानसिक त्रास देण्यासाठी पाठवल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आपल्याच पत्नीचे असे व्हिडीओ पाहून विनोदला प्रचंड मानसिक धक्का बसला. समाजातील बदनामी आणि वैयक्तिक अपमानाचे ओझे सहन न झाल्याने त्याने २५ सप्टेंबरच्या पहाटे राहत्या घरात गळफास घेतला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांची कारवाई आणि गुन्ह्याची नोंद
विनोदच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी आणि मामा संतोष ढगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील ते चॅट्स, पाठवलेले व्हिडीओ आणि फोन कॉल्सचे रेकॉर्ड आता पोलिसांच्या तपासाचा मुख्य भाग असणार आहेत.