शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वासाठी किणेंनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

By admin | Updated: November 18, 2016 03:01 IST

बदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या

कुमार बडदे / मुंब्राबदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या सहकारी नगरसेविका रेश्मा पाटील यांच्यासह इतर दोन माजी नगरसेविकांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे इतरही काही नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रातून ठामपा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे आव्हान संपुष्टात येणार आहे. महापौर निवडणुकीत केलेल्या गद्दारीमुळे ते राष्ट्रवादीच्या रडारवर होते. भविष्यात राष्ट्रवादीकडूनच आपले सर्जिकल स्ट्राइक म्हणून त्यांनी त्याच पक्षात प्रवेश करून आपला स्वार्थ साधल्याची राजकीय वर्तुळात सुरस चर्चा सुरू आहे. विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून किणे यांनी ४५ हजार ८२१ मते मिळवून कडवी झुंज दिली होती. तेव्हापासून ते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील राजकीय हाडवैर प्रसिद्ध होते. तसेच मागील सात वर्षांत किणे आणि आव्हाड यांनी अनेकदा एकमेकांवर वैयक्तिक जाहीर आरोप केले होते. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या मागील पाच निवडणुकांमध्ये कधी पक्षाच्या चिन्हावर, तर कधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे किणे २०१२ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्या निवडणुकीत ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. परंतु, त्यानंतरही त्यांच्याबरोबर असलेल्या राजकीय वैमनस्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करून ते निवडून येऊ नयेत, यासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. ही पार्श्वभूमी पाहता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रात पराभव होण्याची त्यांना भीती होती. यामुळेच ते राष्ट्रवादीच्या तंबूत शिरल्याची चर्चा रंगू लागली आहे.