शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण गरजेचे

By admin | Updated: September 14, 2015 23:50 IST

कळंबोली नोडमधील सिंग सिटी रुग्णालयाजवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करणासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. या होल्डिंग पाँडचे नवी

कळंबोली : कळंबोली नोडमधील सिंग सिटी रुग्णालयाजवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करणासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. या होल्डिंग पाँडचे नवी मुंबईच्या सागर विहारच्या धर्तीवर सुशोभीकरण करावे, यासाठी विरंगुळ्याचे केंद्र बनवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक कार्यालयाकडे याबाबत निवेदन देण्यात आले असून सिडकोने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता कामोठे सिग्नल ते रोडपाली रोड आणि खाडीलगत सिडकोने होल्डिंग पाँड तयार केला. या पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले असून खाडीत हे पाणी निघून जाते. जास्त पाऊस झाल्यास पंपाव्दारे पाँडमधील पाणी उपसण्याची सुविधा या ठिकाणी आहे. हा परिसर महामार्ग, तळोजा लिंक रोड आणि खाडीलगत आहे. सहा-सात किमीचा परीघ असल्याने या परिसराचा चांगल्या पध्दतीने विकास होवू शकतो. सध्या होल्डिंग पाँडच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्याचबरोबर डेब्रिज व कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहावा, त्याचा वापर व्हावा अशी मागणी होत आहे. कळंबोलीत विरंगुळ्याकरिता करवली नाक्यावर असलेले गार्डनवगळता दुसरे ठिकाण नाही. त्यामुळे होल्डिंग पाँड याकरिता चांगला पर्याय होईल, असा प्रस्ताव शिवसेनेचे शहरप्रमुख डी.एन. मिश्रा यांनी दिला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेवून विविध प्रलंबित मागण्या, समस्या आणि प्रश्नावर चर्चा केली आहे. (वार्ताहर)पाँडचे रूप बदलणार!विसर्जन तलाव ते कामोठे सिग्नल हा जवळपास दोन कि.मी. पट्ट्याचा विकास होवू शकतो. त्याचबरोबर मार्बल मार्केटच्या पाठीमागील बाजूला सुशोभीकरण करण्यास मोठी संधी आहे. येथील वाढलेली झाडेझुडपे काढून त्या जागी फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. होल्डिंग पाँडला पिंचिग करून प्रशस्त असा जॉगिंग ट्रॅक विकसित होऊ शकतो असे दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. बसण्याकरिता आसन व्यवस्था, दिवाबत्ती, कारंजे, बोटिंगची सोय होऊ शकते. होल्डिंग पाँड येथे विरंगुळा केंद्र बनवण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर या ठिकाणी विरंगुळा केंद्र बनवण्याचा निर्णय घेण्यात येईल. - किरण फणसे, प्रशासकीय अधिकारी सिडको