शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगत औषध-गोळ्यांचा खच

By admin | Updated: December 8, 2015 00:59 IST

पनवेल-सायन महामार्गालगत कामोठे टोलनाक्याजवळ अज्ञात व्यक्तीने वापरायोग्य नसलेली गोळ्या, औषधे रस्त्यालगत टाकली आहेत

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गालगत कामोठे टोलनाक्याजवळ अज्ञात व्यक्तीने वापरायोग्य नसलेली गोळ्या, औषधे रस्त्यालगत टाकली आहेत. यामुळे नागरिकांच्या तसेच गुरांच्या आरोग्यास धोका उद्भवण्याची शक्यता असून, ही औषधे त्वरित उचलण्यात यावीत आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, आशी मागणी परिसरातील नागरिकांकडून आहे. कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, रुग्णालये आणि मेडिकल्स आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र कचरा उचलण्यासाठी पैसे लागत असल्याने काही रुग्णालये आणि डॉक्टर बायो मेडिकल वेस्ट कचराकुंडीत टाकतात. सिडकोकडूनही याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याने मेडिकल वेस्ट मिळेल त्या जागेवर डम्प करण्यात येत आहे. औषध विक्रेत्यांकडूनही मुदत संपलेली औषधेही कचऱ्यात टाकण्यात येत आहेत. कामोठे वसाहतीतून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने पुढे बाजूला रात्रीच्या वेळी अशा प्रकारचा कचरा टाकला जात आहे. खाडीप्रवण क्षेत्र असल्याने त्यामध्ये जलचर आहेत. मात्र अशा प्रकारे औषध तिथे टाकल्याने जलचरांवरसुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वी मानसरोवरजवळ भूखंडावर अशाच प्रकारे औषधे डम्प करण्यात आली होती. रहिवाशांनी सिडकोकडे तक्रारी केल्यानंतर ही औषधे उचलण्यात आली. मात्र संबंधित औषध टाकणाऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. (वार्ताहर)