शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

केशकर्तनाचे दर वाढले, कटींगसाठी १५०, दाढीसाठी मोजा १०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 1:01 AM

नवी मुंबईतील ८० टक्के केशकर्तनालय व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली असली, तरी पूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे. यानुसार, वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. (Haircut rates)

ठळक मुद्देपूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे.नवी मुंबई शहरात लहान-मोठी ७०० ते ८०० सलून व्यावसायिकांची दुकाने आहेत. वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

  नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सलून, ब्युटी पार्लर बंद होते. अलीकडेच ही दुकाने सुरू करण्याची राज्य सरकारने सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देऊन परवानगी दिली आहे. नवी मुंबईतील ८० टक्के केशकर्तनालय व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली असली, तरी पूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे. यानुसार, वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

नवी मुंबई शहरात लहान-मोठी ७०० ते ८०० सलून व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यात ३० टक्के वातानुकूलित आणि सर्व सामान्यांना परवडेल, अशी ७० टक्के दुकाने आहेत. दुकानातील खुर्च्यांची संख्या कमी करून खुर्च्यामध्ये अंतर ठेवणे, मास्क, सॅनिटायझारचा वापर करणे, ग्राहक आणि सलून कारागीर यांना यूज अँड थ्रो पीपीई  किट वापरणे, तसेच हँडग्लोज, डोक्याला पीपीई टोपी अशा प्रकारचा खर्च वाढत आहे. तो आम्हाला न परवडणारा आहे. त्यामुळे सलूनमध्ये दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊन काळात केशकर्तनालयात काम करणारे कारागीर त्यांच्या मूळगावी गेल्यामुळे पूर्वीसारखी या व्यवसायात कमाई होत नाही. त्यातच कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून आम्हाला एका ग्राहकासाठी पूर्वीपेक्षा ३० ते ३५ रुपये जादा खर्च येतो. त्यामुळे दरवाढ करावी लागत आहे.-नरेश गायकर, अध्यक्ष, नाभिक विकास फाउंडेशन, नवी मुंबई

गेल्या सहा महिन्यांत केशकर्तनालय व्यवसाय बंद असल्यामुळे दुकान मालकाला काही बँकांकडून कर्जे काढून भाडे देण्याची वेळ आमच्यावर आली. कारागिरांचा पगार परवडत नसल्यामुळे स्वतः काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. - हिदास गायकर, अध्यक्ष, हु. विरभाई कोतवाल नाभिक संस्था, घणसोली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई