शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली हस्तांतरण प्रगतिपथावर

By admin | Updated: November 18, 2016 03:58 IST

घणसोली नोड हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी

नवी मुंबई : घणसोली नोड हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, हस्तांतरणापूर्वी पायाभूत सुविधांची सर्व कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली असून मागण्यांचे निवेदन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना दिले आहे. सिडकोने घणसोली नोडमधील समस्या सोडवून तो महापालिकेकडे हस्तांतर करावा यासाठी आमदार संदीप नाईक यांनी २०१० पासून सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वारंवार सिडको व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला आहे. पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून येथील समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. भूषण गगराणी यांची नुकतीच भेट घेवून याविषयी चर्चा केली. गगराणी यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करत असल्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने कामाबरोबरच, चांगला दर्जा राहील याकडे लक्ष द्यावे. जी कामे महापालिका करणार आहे त्याचा परतावा पालिकेला देण्यात यावा, अशी मागणी नाईक यांनी केली.घणसोली हस्तांतरणाविषयी माहिती देताना नाईक म्हणाले, जवळपास सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. आतापर्यंत सिडकोचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक या सर्वांना वारंवार पत्रे दिली आहेत. त्यांची भेट घेवून चर्चा केली आहे. लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया मार्गी लागेल असा विश्वासही व्यक्त केला.