शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार रमलेत गणेशभक्तीत

By admin | Updated: September 21, 2015 03:10 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात. गणेश उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. साध्यापद्धतीने उत्सव साजरा करताना प्रबोधनाचा वारसाही जपला जात आहे. दिवसभर गोणी उचलण्याचे काम करणारे माथाडी कामगार बाजारपेठा मुंबईत असल्यापासून गणेश उत्सवाचे आयोजन करत आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील अण्णासाहेबत पाटील सांस्कृतीक सेवा मंडळाच्यावतीने ३६ वर्षापासून उत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी राज्यभर दुष्काळ असल्यामुळे कामगारांनी देखाव्यांवर खर्च केला नाही. गणरायासमोर रोज भजनाचे आयोजन केले जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाणी बचत व दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. दैनंदिन काम करून माथाडी कामगार गणरायाची सेवा करत आहेत. कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, अध्यक्ष पोपट पवार, सचीव गुंगा पाटील, शामराव जाधव, विठ्ठल धनावडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. व्यापारी, मेहता, वाहतूकदार सर्वच उत्सवामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. मसाला मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णासाहेब पाटील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माथाडी हॉस्पीटलमधील रूग्णांना मदत, महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ, नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठीचे उपक्रम राबविले जात आहेत. अध्यक्ष सखाराम शेलार, उपाध्यक्ष संतोष अहिरे, नामदेव चिकणे, संतोष धोंडे व इतर पदाधिकारी गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धान्य मार्केटमध्ये गणेश उत्सव मंडळाने माथाडी रूग्णालयास एक लाख रूपये दिले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मदत व दुष्काळग्रस्तांनाही मदत करण्याचे निश्चीत केले आहे.