राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत काशी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:05 AM2019-01-31T00:05:43+5:302019-01-31T00:05:59+5:30

७७० शेतकरी घेणार लाभ; ज्येष्ठ नागरिकांचा केला सन्मान

Free Kashi Tour for Farmers of the State | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत काशी यात्रा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत काशी यात्रा

Next

नवी मुंबई : राज्यातील शेतकरी वर्षभर शेतीची मशागत करीत असतात. राज्यात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. शेतकºयांना निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे. या शेतकºयांना देवदर्शन करता यावे यासाठी नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून मोफत काशी यात्रेचे दर्शन देण्यात येते. यावर्षी या यात्रेत राज्यातील सुमारे ७७0 शेतकरी सहभागी झाले आहेत.

राज्यातील शेतकºयांना निसर्गाची न मिळणारी साथ, शेतीच्या विकासासाठी बँक, पतसंस्थांमधून घेतलेल्या कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकºयांचे नैराश्य दूर करण्यासाठी वेलफेअरचे अध्यक्ष सोपान मेहेर यांच्यातर्फे आठ वर्षांपासून काशी, विश्वेश्वर, अयोध्या, मलकापूर अशी सुमारे १२ दिवसांच्या यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेचे यंदाचे नववे वर्ष असून यावर्षी या यात्रेसाठी ७७0 शेतकºयांना या यात्रेचा लाभ मिळाला आहे. मंगळवारी २९ जानेवारी रोजी तुर्भे येथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शुभेच्छा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी वयाची ७0 वर्षे पूर्ण केलेल्या शेतकºयांचा सन्मान देखील करण्यात आला.

या यात्रेच्या निमित्ताने मुंबई शहरात पहिल्यांदाच आलो आहे. काशीची यात्रा करण्याची खूप इच्छा होती. या असोसिएशनच्या माध्यमातून ही इच्छा देखील पूर्ण होत असल्याने नक्कीच आनंद आहे.
- बाळाभाऊ इक्कर, शेतकरी, जालना

चार वर्षांपूर्वी या यात्रेत सहभागी झालो होतो. यात्रेकरूंना प्रवासात कोणताही त्रास होणार नाही याप्रकारे नियोजन करण्यात येते. यावर्षी स्वयंसेवक म्हणून या यात्रेत सहभागी झालो आहे.
- विठ्ठल झोडगे,
शेतकरी, पुणे

Web Title: Free Kashi Tour for Farmers of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.