शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

नवी मुंबईत चारस्तरीय रचना; कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 1:34 AM

२३,८४२ नागरिकांना फ्लू क्लिनिकचा लाभ

- नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर त्रिस्तरीय आरोग्य रचना करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने यामध्ये फ्लू क्लिनिकची भर टाकून चारस्तरीय रचना तयार केली आहे. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होत आहे. फ्लू क्लिनिकचा २३,८४२ नागरिकांना लाभ झाला आहे. शहरात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १६,८०० पेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणाºया कर्मचाऱ्यांमुळे शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे. नवी मुंबईमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. १३ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आतापर्यंत अनेक कर्मचाºयांनी साप्ताहिक सुट्टी घेतलेली नाही. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ स्वत: सर्व उपाययोजनांवर लक्ष ठेवून आहेत.

शासनाने राज्यात सर्वत्र त्रिस्तरीय रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचा समावेश आहे. सर्वसाधारण लक्षणे असणारे रुग्ण व होम क्वारंटाइन शक्य नसणाºयांना या केंद्रात ठेवले आहे. नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी ही केंद्रे सुरू असून त्यामध्ये २०९२ खाटांची सोय करण्यात आली आहे. ही क्षमता लवकरच २२४२ इतकी वाढविण्यात येणार आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाºया कोरोना रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ठेवले जात आहे.

नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची तीन सेंटर असून त्यामध्ये५३५ खाटांची सुविधा केली आहे. ही क्षमता १०७५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड रुग्णालयात ठेवण्यात येते. नवी मुंबईत तीन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असून ७७४ खाटांची क्षमता आहे. त्यामधील १६८ खाटांचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. भविष्यात अजून १५० खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

फ्लू क्लिनिक ठरतेय प्रभावी; ताप, सर्दी, खोकल्यावर उपचार

शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी त्रिस्तरीय रचना तयार केली असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत.

नवी मुंबईत फ्लू क्लिनिक सुरू करून चारस्तरीय रचना तयार केली आहे. नेरूळ, बेलापूर, ऐरोली व तुर्भे रुग्णालय व २३ नागरी आरोग्य केंद्रांत ही क्लिनिक सुरू केली आहेत. या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला असणाºया रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खासगी क्लिनिक बंद असल्यामुळे मनपाच्या फ्लू क्लिनीकचा शहरवासीयांना आधार असून आतापर्यंत तब्बल २३,८४२ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका