शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

मोबाइलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर, ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम, हस्ताक्षराची लय, गती हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 00:50 IST

side effects of online learning : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे. मोबाइलवर फिरणाऱ्या बोटांना लेखणीचा विसर पडला आहे. परीक्षा जवळ आली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची लय व गती हरवल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. (Fingers moving on mobile screen, forgetting to write, side effects of online learning, signature rhythm, lost speed)शैक्षणिक आयुष्यात सुंदर हस्ताक्षराला खूप महत्त्व आहे. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे यासाठी शिक्षक आणि पालकांचा कटाक्ष असतो. तर त्यासाठी लहानपणापासून सराव करून घेतला जातो. अक्षर तसेच लिहिण्यासाठी लागणारा वेग हे दहावी, बारावीसाठी खूप महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शिक्षण प्रणालीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागल्याने मुलांचे लिखाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. शिकवताना रनिंग नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने हातांच्या बोटांना लेखणीचा सराव कमी होत गेला. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या वेळेत उत्तरपत्रिका सोडविणे मुश्कील होईल याची चिंता पालकांना सतावत आहे. मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. कोरोना काळात मुलांचे बिघडलेले अक्षर तसेच लिखाणाची गती वाढविण्यासाठी नियमित शुद्धलेखनाचा सराव करणे खूप गरजेचे आहे. ऑनलाइनमुळे मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालविण्यासाठी लेखन सराव योग्य राहील. संजय खटके, शिक्षक लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाइनमुळे कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण, यातूनही स्वाध्याय मुलांना दिला जातो. तो सोडवून घेण्यासाठी शिक्षक तसेच पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. मुलांकडून सराव करून घेतल्याने हस्ताक्षर चांगले येते. आम्हीदेखील मुलांना लिहिण्याची आवड निर्माण करतो. खुशी सावर्डे, शिक्षिका विद्यार्थ्यांनो, हे करा!दररोज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील वहीचे एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपेपर सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न - उत्तरे सोडवावीत. म्हणजे गती वाढते.एकदम लिखाण न करता काही दिवस ठरावीक आणि मोजकेच लिखाण करावे, परंतु लिखाणात सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे.पालकांनी आपल्या पाल्याच्या लिखाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे. त्यांना त्यासाठी मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीदेखील वाढेल. पालकांचे मत… ऑनलाइन शिक्षणामुळे गत वर्षापासून मुले केवळ ऐकत आहेत. लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी झाला आहे. त्यामुळे मुले लिखाणाला कंटाळली आहेत. याचा परिणाम मुलांच्या हस्ताक्षरावर झाला आहे.- नीलम आंधळे, पालक मोबाइलमुळे लेखन थांबले आहे. शिक्षकांचा प्रत्यक्ष दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. त्यात लिखाण कमी झाल्याने हस्ताक्षर खराब येत आहे. घरीच सराव करून घेत असल्याने यात सुधारणा होत आहे.     - संजय पवार, पालक  

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा