शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:07 IST

Cyber Security News: केंद्र सरकारने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचे’ नियम शुक्रवारी अधिसूचित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली:
केंद्र सरकारने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचे’ नियम शुक्रवारी अधिसूचित केले असून, देशात प्रथमच डिजिटल प्रायव्हसीला औपचारिक कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. हे नियम टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंटरनेट इंटरमीडियरी, ई-कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्या संस्थांना पुढील १८ महिन्यांत सर्व नियम पाळावे लागणार आहेत. अन्यथा त्यांना अत्यंत कडक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 


डेटा प्रोटेक्शन बोर्ड

दिल्लीमध्ये एक पूर्णपणे डिजिटल पद्धतीने काम करणारा डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन केला जाणार आहे.  यात एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतील. नियमांचे उल्लंघन किंवा डेटा लीक झाल्यास हा बोर्ड दंडात्मक कारवाई करेल.  या कायद्यामुळे भारतात प्रथमच डिजिटल गोपनीयतेला मजबूत आणि स्पष्ट संरक्षण मिळाले आहे.

डेटा लीक झाला तर...

डेटा उल्लंघनाची माहिती समजताच ७२ तासांत डेटा प्रोटेक्शन बोर्ड व संबंधित वापरकर्त्यांना कळविणे बंधनकारक आहे.  लीक कसा झाला, त्याचा परिणाम काय, भविष्यातील धोके कोणते आणि ते कमी करण्यासाठी काय उपाय- हे सर्व तपशील द्यावे लागतील.  

काय आहे नवीन बदल?

कोणतीही कंपनी वापरकर्त्यांची परवानगी घेताना त्यांचा डेटा नेमका कसा आणि कुठे वापरला जाईल, याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक. वापरकर्ते कधीही दिलेली परवानगी मागे घेऊ शकतात. माहितीबाबत हक्कभंग झाला असे वाटल्यास डेटा प्रोटेक्शन बोर्डात तक्रार करता येईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Data Security for All: New Rules in 18 Months!

Web Summary : India's digital privacy gets legal protection with the DPDP Act. Organizations handling data must comply within 18 months or face penalties. A Data Protection Board will be established to address violations. Companies must clearly explain data usage, and users can withdraw consent. Data breach notifications must be made within 72 hours.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइन